नवी दिल्ली- व्हॉट्सअॅप हे अॅप आता सगळ्यांच्याच जगण्याचा अविभाज्य भाग झाले आहे. झोपेतून उठल्या उठल्या पहिल्यांदा व्हॉट्सअॅप पाहण्याची सवय एव्हाना सगळ्यांच्याच अंगवळणी पडली आहे. ग्राहकांमधली ही लोकप्रियता पाहून व्हॉट्सअॅपही नवनवे फीचर्स उपलब्ध करून देत असतो. WhatsAppनं 2018च्या सुरुवातीपासूनच यूजर्ससाठी नवनवे फीचर्स ग्राहकांच्या सेवेत आणण्याचा धडाका लावला आहे. आता एक पाऊल पुढे टाकत WhatsApp आणखी पाच फीचर्स ग्राहकांसाठी आणणार आहे. सध्या तरी हे फीचर्स बिटा वर्जनमध्ये देण्यात आले आहेत. तसेच लवकरच व्हॉट्सअॅपकडून ग्राहकांसाठी नवे अपडेट्स येण्याची चिन्हे आहेत. या फीचर्समध्ये प्रायव्हेट रिप्लाय, व्हेकेशन मोड, लिंक्ड सोशल मीडिया अकाऊंट्स, इनलाइन इमेज आणि सायलेंड मोडचा समावेश आहे.
- प्रायव्हेट रिप्लाय फीचर
कंपनीनं स्टिकर फीचर उपलब्ध करून दिल्यानंतर प्रायव्हेट रिप्लाय फीचरची सुविधा ग्राहकांसाठी आणली आहे. या फीचर्सच्या माध्यमातून ग्रुप चॅटमध्येही तुम्ही प्रायव्हेट रिप्लाय करू शकता. या फीचरच्या मदतीनं ग्रुप चॅटमध्येही कोणत्याही अडचणीविना एक युजर्स दुस-या युजर्सशी चाट करू शकतो. व्हॉट्सअॅप ग्रुपवरचे मेसेज पाहण्यासाठी तीन डॉटवर क्लिक करून प्रायव्हेट रिप्लाय ऑप्शन वापरू शकता. सध्या तरी हे फीचर बिटा वर्जनमध्ये उपलब्ध आहे.
- Vacation Mode फीचर
तुम्ही जेव्हा सुट्टीवर किंवा फिरायला जाता तेव्हा या फीचरचा वापर करू शकता. या फीचर्सच्या माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअॅपच्या रिंगटोनपासून दूर राहू शकता. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना सुट्ट्यांमध्ये तुम्ही या फीचरचा वापर करू शकता. सध्या तरी हे फीचरची टेस्टिंग सुरू आहे. तुम्ही या फीचर्सच्या माध्यमातून कन्वर्सेशन म्युट करू शकता. पुन्हा जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅप हातात घ्याल, तेव्हा नवे मेसेज मिळतील.
- Linked Social Media अकाऊंट
या फीचरच्या माध्यमातून तुम्ही सोशल मीडियावर प्रभावी असलेल्या फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, इन्स्टाग्रामला व्हॉट्सअॅपशी लिंक करू शकता. त्यामुळे तुम्ही केलेला मेसेजचं या सर्व प्लॅटफॉर्मवर नोटिफिकेशन पाठवता येईल. WABetaInfoच्या माहितीनुसार या फीचरच्या माध्यमातून तुम्ही फेसबुक अकाऊंट रिकव्हर करू शकता.
- Silent Mode फीचर
Silent Mode फीचरच्या माध्यमातून तुम्ही तुमचं व्हॉट्सअॅप सायलेंटवर टाकू शकता. हे फीचर म्युट चॅटऐवजी मेसेज लपवण्यास मदत करेल. या फीचरचा वापर केल्यास तुम्हाला अनरिड मेसेजचे नोटिफिकेशन पाहता येणार नाहीत. विशेष म्हणजे हे फीचर सेटिंगमध्ये जाऊन ऑन करण्याची गरज नाही. त्या फीचरचा व्हॉट्सअॅप वर्जनमध्येच समावेश आहे.
- Inline image
WABetaInfoच्या माहितीनुसार WhatsApp अँड्रॉइट बिटा वर्जन 2.18.291मध्ये inline image नोटिफिकेशन फीचरचं टेस्टिंग सुरू आहे. हे फीचर फक्त अँड्रॉइड 9.0 Pie किंवा त्याच्याहून अॅडवान्स वर्जनमध्ये काम करेल.