WhatsApp अत्यंत लोकप्रिय आहे. हे App आल्यापासून टेलिकॉम कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या टेक्स्ट मेसेजचा वापर कमी झाला आहे. जर WhatsApp ने तुम्हाला बॅन केलं किंवा तुम्ही या मेसेजिंग App च्या सेवेचा लाभ घेऊ शकत नसाल तर काय होईल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? एका चुकीमुळे असं नक्कीच घडू शकतं. WhatsApp अकाऊंट बॅन होऊ शकतं. त्याबद्दल जाणून घेऊया...
स्पॅम मेसेजपासून राहा दूर
WhatsApp युजर्सनी स्पॅम मेसेजपासून दूर राहावं. तुम्ही मेसेजिंग Appsवर ग्रुप्स किंवा ब्रॉडकास्टिंगद्वारे सतत स्पॅम मेसेज शेअर करत असाल, तर यामुळे तुमच्यावर बंदी येऊ शकते.
खोट्या बातम्या शेअर करू नका
WhatsApp युजर्सनी नेहमीच खोट्या बातम्या शेअर करणं टाळावं. अनेक युजर्स माहिती चेक न करता एखादा मेसेज अनेक WhatsApp ग्रुप्समध्ये शेअर करतात. असं करणं केवळ समाजासाठी धोकादायक ठरू शकत नाही, तर तुमचं अकाऊंटही बॅन होऊ शकतं.
पोर्नोग्राफीपासून दूर राहा
जर तुम्ही जाणूनबुजून किंवा नकळत पोर्नोग्राफीशी संबंधित क्लिप किंवा फोटो इमेज WhatsApp वर कोणाला शेअर करत असाल तर अडचणीत येऊ शकता.
खोटं नाव आणि फोटो वापरू नका
WhatsApp युजर्सनी जाणूनबुजून दुसऱ्याचा फोटो आणि नाव वापरू नये. एखाद्या सेलिब्रिटी किंवा खेळाडूचा फोटो टाकला तर ती वेगळी गोष्ट आहे. जर तुम्ही एखाद्या सामान्य व्यक्तीचा फोटो फसवणूक करण्यासाठी किंवा एखाद्याचे नुकसान करण्यासाठी वापरत असाल तर यामुळे तुमचे अकाऊंट बॅन केलं जाईल.
थर्ड पार्टी Apps वापरणं टाळा
जर युजर्स WhatsApp Delta, GBWhatsApp, WhatsApp Plus असे इतर Apps वापरत असतील, तर तुमचं WhatsApp अकाऊंट कायमचं बंद केलं जाऊ शकतं. जर अनेक युजर्सने तुमच्या WhatsApp अकाऊंटची तक्रार केली तर तुमचं अकाऊंट बॅन केलं जाऊ शकतं.