WhatsApp आता एक नवीन अकाउंट रिस्ट्रिक्शन फीचर आणत आहे. तुमच्याकडून चूक झाल्यास हे फीचर तुमचं WhatsApp अकाऊंट काही काळासाठी बॅन करेल. WhatsApp ची पॉलिसी अतिशय कडक आहे, ज्या अंतर्गत नियमांचं उल्लंघन झाल्यास अकाऊंट बॅन केलं जाऊ शकतं. मात्र, यामध्ये WhatsApp अकाऊंट कायमचं बॅन होणार नाही.
WhatsApp चं अकाऊंट हे फक्त काही काळासाठी ब्लॉक केलं जाईल, ज्यामुळे कोणीही चॅटिंग किंवा कॉलिंग करू शकणार नाही. WhatsApp चं हे नवीन फीचर अद्याप डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे. मात्र, त्याचं बीटा व्हर्जन लवकरच रोल आऊट केलं जाण्याची शक्यता आहे.
असं म्हटलं जातं आहे की, मेटा ओन्ड प्लॅटफॉर्मला वाटतं की अकाऊंट बॅन करणं हा काही उपाय नाही. त्याऐवजी युजर्सचं अकाऊंट हे रिस्ट्रिक्ट केलं जाईल, जेणेकरून युजर्सना त्यांची चूक लक्षात येईल. तसेच, काही कालावधीनंतर, युजर्स अकाऊंट पुन्हा वापरण्यास सक्षम असतील.
WhatsApp वर येईल एक पॉपअप मेसेज
WeBetaInfo रिपोर्टनुसार, हे अपकमिंग फीचरच्या रोलआउटनंतर, तुम्ही चूक केल्यास तुमचं अकाऊंट हे बॅन केलं जाईल. तसेच अकाऊंटवर एक पॉपअप बॉक्स, मेसेज दिसेल, जो तुमचं अकाऊंट किती दिवसांसाठी बॅन केलं जाईल हे सांगेल.