काही दिवसांपूर्वी व्हाट्सअॅपने नवीन फिचर जोडले होते, या फीचरमुळे आलेल्या व्हॉइस मेसेजेसचा वेग वाढवता येतो. मोठे व्हॉइस मेसेजेस ऐकताना हा फिचर खूप उपयोगी ठरतो. आता कंपनी व्हॉइस मेसेजसाठी अजून फिचर घेऊन येणार आहे, अशी बातमी आली आहे. हे फिचर देखील खूप उपयुक्त ठरणार आहे.
अनेकदा आपण चुकून एखादा मेसेज पाठवतो, असे मेसेज डिलीट करण्याची सोय अॅपमध्ये आहे. परंतु, आता व्हाट्सअॅप तुम्हाला व्हॉइस मेसेजेस पाठविण्यापूर्वी ते ऐकण्याचा पर्याय देणार आहे. म्हणजे चुकून पाठविल्या जाणाऱ्या व्हॉइस मेसेजेसचे प्रमाण कमी होईल. या फिचरची चाचणी अँड्रॉइडवर केली जात आहे. WhatsApp अँड्रॉइड बीटा 2.21.12.7 मध्ये हे फिचर उपलब्ध झाले आहे. आयओएससाठी पण लवकरच हे फिचर येणार असल्याची माहिती WABetaInfo ने दिली आहे.
व्हाट्सअॅपच्या अजून काही नव्या फीचर्सची माहिती WABetaInfo वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली होती. यात व्हाट्सअॅप Multi Device Support, Disappearing Mode आणि View Once चा फीचरचा समावेश असेल.
मल्टी डिवाइस सपोर्ट फिचर (Multi-Device Support Feature)
एकच व्हाट्सअॅप नंबर अनेक फोन्समध्ये वापरता यावा अशी अनेकांची मागणी होती. Multi Device Support फीचरच्या माध्यमातून हि मागणी पूर्ण होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार युजर त्यांचे व्हाट्सअॅप अकाउंट को एकाचवेळी 4 फोन्समध्ये वापरू शकतील. यापूर्वी एका स्मार्टफोनमधील व्हाट्सअॅप नंबरने दुसऱ्या फोनमध्ये लॉगिन केल्यावर जुन्या फोनवरील अकॉउंट बंद होत असे. एकापेक्षा जास्त फोन्स वापरणाऱ्या लोकांसाठी हे फिचर वरदान ठरणार आहे.
डिसअपेरिंग मोड फिचर (Disappearing Mode Feature)
Instagram वापरणाऱ्या लोकांना डिसअपेरिंग फीचरची माहिती असेलच. या फीचर अंतगर्त ठरविक वेळेत एखाद्या व्यक्तीला पाठवण्यात आलेले मेसेजेस आपोआप गायब होतात. हे फीचर आता लवकरच व्हाट्सअॅप युजर्सना पण मिळणार आहे.
व्यू वन्स फिचर (View Once Feature)
व्हाट्सअॅप व्यू वन्स फीचर देखील लवकरच रोलआउट होऊ शकते. या फिचरमध्ये पाठवलेला फोटो किंवा व्हिडीओ मेसेज मिळवणारा व्यक्ती फक्त एकदाच बघू शकतो. त्यानंतर तो फोटो किंवा व्हिडीओ पुन्हा बघता येत नाही. या फिचरविषयी अधिक माहिती समोर आली नाही.