WhatsApp वर एकामागून एक नवीन फीचर्स येत आहेत. कंपनीने काही दिवसांपूर्वी सर्च बारमध्ये Meta AI ऑफर करण्यास सुरुवात केली होती, त्यानंतर कंपनी हे फीचर सतत अपग्रेड करण्याचा विचार करत आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp आता आपल्या युजर्ससाठी अतिरिक्त चॅटबॉट्ससह AI स्टुडिओ फीचर आणणार आहे.
WhatsApp वरील प्रत्येक फीचरची माहिती देणाऱ्या WABetainfo ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. ज्यामध्ये असं म्हटलं आहे की या फीचरमध्ये प्रत्येक प्रकारच्या प्रश्नासाठी पर्सनल चॅटबॉट उपलब्ध असेल. कंपनी या अपडेटमध्ये एक रिडिझाइन सेक्शन प्रदान करत आहे, ज्यामध्ये युजर्स मेटा आणि थर्ड पार्टी क्रिएटर्सचे अनेक हेल्पफुल आणि मजेदार AI एक्सप्लोर करू शकतात.
आवडत्या AI चॅटबॉटला विचारा प्रश्न
WABetainfo नुसार, हे फीचर बीटा अँड्रॉइड व्हर्जन 2.24.15.10 मध्ये दिसलं आहे. WhatsApp च्या या फीचरबद्दल, असा अंदाज वर्तवला जात आहे की WhatsApp एक्टर्नल क्रिएटर्सना त्यांचे स्वतःचं AI चॅटबॉट्स तयार करण्याची परवानगी देऊ शकतं. या नवीन फीचरमुळे युजर्सचा अनुभव खूप चांगला असणार आहे कारण यामध्ये युजर्स त्यांच्या आवडत्या चॅटबॉटला विविध प्रकारचे प्रश्न विचारू शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार, WhatsApp चं हे AI फीचर लवकरच आणलं जाऊ शकतं. बीटा चाचणी झाल्यानंतरच, कंपनी ग्लोबल युजर्ससाठी या फीचरचं स्टेबल व्हर्जन रोलआऊट करू शकतं. WhatsApp हे संवाद होण्याच अत्यंत प्रभावी माध्यम असून ते युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं.