शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

WhatsApp चं नवं अपडेट, 'या' फीचरच्या जागेत झाला बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 1:08 PM

इन्संट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp हे आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. WhatsApp ने पुन्हा एकदा आपल्या युजर्ससाठी एक खास बदल केला आहे.

ठळक मुद्दे इन्संट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp हे आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं.WhatsApp ने पुन्हा एकदा आपल्या युजर्ससाठी एक खास बदल केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जन 2.19.101 अपडेटमध्ये 'अर्काइव्ड चॅट्स' या फीचरला मेन साइड मेन्यूमध्ये जागा देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - इन्संट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp हे आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. WhatsApp ने पुन्हा एकदा आपल्या युजर्ससाठी एक खास बदल केला आहे. WABetaInfo ने याबाबतची माहिती दिली आहे. WhatsApp ने अपडेट केल्यानंतर एका फीचरच्या जागेत बदल केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जन 2.19.101 अपडेटमध्ये 'अर्काइव्ड चॅट्स' या फीचरला मेन साइड मेन्यूमध्ये जागा देण्यात आली आहे. सध्या हा पर्याय चॅटमध्ये सर्वात खाली दिसत आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्य़ा अपडेटनंतर Archived Chats मेन मेन्यूमध्ये दिसणार आहे. 

व्हॉट्सअ‍ॅपवरचं हे फीचर आता तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर मिळणार आहे. आतापर्यंत तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर ‘New Group’, ‘New Broadcast’, ‘WhatsApp Web’, ‘Starred Message’ आणि ‘Settings’ चे पर्याय मिळतात. मात्र अपडेटनंतर आता हे फीचर यामध्येच ‘WhatsApp Web’ च्या खाली ‘Archived Chats’ चा पर्याय मिळणार आहे. मात्र WABetaInfo ने व्हॉट्सअ‍ॅपचं 2.19.116 अपडेट आल्यानंतर ‘Archive’ फीचर परत चॅटच्या खाली दिसणार असल्याची माहिती दिली आहे. ‘Ignore Archive Chats’ फीचर आल्यानंतर हे फीचर पुन्हा एकदा मेन मेन्यूमध्ये शिफ्ट केलं जाण्याची शक्यता आहे. 

WhatsApp वरचे जुने Emojis गायब होणार; 'हे' आहे कारण  WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप आपल्या नव्या डूडल फीचरमध्ये काही विशेष बदल करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप अपडेट झाल्यानंतर डूडल फीचरमधील जुने Emojis गायब होणार असून, त्याजागी ऑफिशियल Emojis येणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर इमोजीच्या माध्यमातून चॅटींगची गंमत आणखी वाढत असते. तसेच मेसेज टाईप करण्यापेक्षा इमोजीच्या माध्यमातून संवाद साधणं अनेकांना जास्त सोयीचं वाचत असतं. सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या डूडलमध्ये अनेक कस्टमाइज स्टीकर्स आहेत, जे मीडिया फाइल पाठवताना एडिट ऑप्शन सिलेक्ट करून फोटोवर लावता येतात. व्हॉट्सअ‍ॅप मधले हे अपडेट्स पाहायचे असतील तर फिचर Enable करावं लागेल त्याशिवाय ते Doodle UI मध्ये दिसणार नाहीत असं WABetaInfoने म्हटलं आहे. हा बदल घडवून आणण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ने बीटा व्हर्जन 2.19.106 मधले जुने Emojis काढून त्याठिकाणी नवे Emojis टाकले आहेत.

WhatsApp वर आलं 'इग्नोर आर्काइव्ह चॅट्स' फीचर, जाणून घ्या खासियत 

...तर तुमचं WhatsApp अकाऊंट होणार ब्लॉक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया साईट्स आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक नवनवीन बदल करत आहे. फेक न्यूज किंवा तेढ निर्माण करणाऱ्या मेसेजला आळा घालण्यासाठी सोशल मीडिया कठोर पावलं उचलत आहे. व्हॉट्सअ‍ॅपनेही  काही फोन नंबर ब्लॉक केले आहे. तसेच काही युजर्सचे चॅट फीचरही बंद केले आहे. चार मुख्य कारणांमुळे व्हॉट्सअ‍ॅपने हे फोन नंबर ब्लॉक केले असल्याची माहिती समोर आली आहे. 

WhatsApp वर क्वालिटी खराब न करता 'असे' पाठवा फोटो

चॅटींगची गंमत वाढणार; आता लँडलाईन नंबरवरही WhatsApp चालणार

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. पण तुम्हाला माहित आहे का? WhatsApp आता लँडलाईन नंबरवरही चालणार आहे. युजर्स आपल्या लँडलाईन नंबरसोबत आपल्याला हवं असल्यास व्हॉट्सअ‍ॅप कनेक्ट करू शकतात यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कोणासोबत शेअर करण्याचीही गरज लागणार नाही व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरचा फायदा हा WhatsApp Business App युजर्सना अधिक होणार आहे. या फीचरच्या मदतीने व्यावसायिक आपल्या लँडलाईन नंबरवरून आरामात व्हॉट्सअ‍ॅप  ऑपरेट करू शकतात. तसेच या फीचरचं वैशिष्ट्य म्हणजे युजर्सचा पर्सनल मोबाईल नंबर तुम्हाला नको असलेल्या लोकांसोबत शेअर करता येत नाही. 

WhatsApp चे 'हे' 5 फीचर्स करणार कमाल; चॅटिंग करताना येणार धमाल 

असा तपासा व्हॉट्सअ‍ॅपवर येणारा फेक मॅसेज

निवडणुकीचा हंगाम, आरोग्य आणि इतर अनेक गोष्टींवर सकाळ संध्याकाळ व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज येत असतात. जवळच्या व्यक्तीने पाठविला असल्याने आपण त्यावर लगेचच विश्वास ठेवतो. जरा थांबा. कशावरून त्या व्यक्तीने तो मॅसेज वाचूनच पुढे पाठविला असेल. खोटा मॅसेज परविणाऱ्याचे हेतू वेगवेगळे असतात. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपने हे मॅसेज खरे की खोटे हे करण्यासाठी नुकतेच एक टूल लाँच केले आहे. यास 'Checkpoint Tipline' अस नाव दिले आहे. PROTO या भारतीय मीडिया स्टार्टअप कंपनीने हे टूल विकसित केले आहे. PROTO ही कंपनी निवडणूक काळात पसरविले जाणार मॅसेज त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी काही संस्थांच्या शोधात आहे. अशा मॅसेजचा शोध लागल्यास त्याद्वारे होणाऱ्या दंगली, अफवा थांबविण्यात यश येणार आहे.

WhatsApp वर आलं नवं फीचर, मेसेज कितीवेळा फॉरवर्ड झाला हे समजणार

काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने फॉरवर्ड मेसेजवर मर्यादा आणली होती. मात्र आता त्यामध्ये बदल करत व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन फीचर आणलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचरमध्ये 'Forwarding Info' आणि 'Frequently Forwarded' यांचा समावेश करण्यात आला आहे. यातील फॉरवर्डिंग इन्फोमुळं मेसेज कितीवेळा फॉरवर्ड केला आहे याची माहिती मिळणार आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने हे नवे फीचर iOS आणि अ‍ॅन्ड्रॉईडच्या बीटा व्हर्जनवर लाँच केले आहे. iOS बीटा 2.19.40.23 आणि Android बीटा 2.19.86 व्हर्जनवर हे अपडेट दिसणार आहे.

 

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान