मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp सतत नवीन फीचर्सवर काम करत आहे. नवीन फीचर्स आधी बीटा टेस्टर्ससाठी रिलीज केली जातात आणि नंतर सर्वसामान्य लोकांसाठी रोलआऊट केली जातात. याच दरम्यान, WhatsApp वर एक नवीन रंगावर आधारित थीम दिसणार आहे, जी आयफोन युजर्ससाठी आहे. जर कोणाला हा बदल आवडत नसेल तर तो त्याच्या आवडत्या रंगानुसार WhatsApp ची थीम सेट करू शकतो.
आत्तापर्यंत आपण आपल्या WhatsApp वर फक्त दोनच कलर थीम पाहत होतो, रेग्यूलर मोड किंवा डार्क मोड... पण आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या रंगांच्या थीम निवडू शकाल. याशिवाय युजर्स चॅट बबलचा रंगही बदलू शकतील. सध्या WhatsApp च्या iOS बीटा व्हर्जनवर या फीचरची चाचणी सुरू आहे. हे फीचर iOS बीटा आवृत्ती 24.11.10.70 मध्ये पाहिलं गेलं आहे, जे हळूहळू सर्वांसाठी रोलआऊट केलं जाईल.
WABetaInfo नुसार, हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या WhatsApp अकाऊंटच्या सेटिंग्जमध्ये जावं लागेल, येथे तुम्हाला चॅटचा पर्याय दिसेल. जेव्हा तुम्ही येथे क्लिक कराल तेव्हा युजरला थीम पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर WhatsApp युजरला डिफॉल्ट चॅट थीमचा पर्याय दिसेल. तुम्ही येथे कोणताही कलर निवडाल, ती डीफॉल्ट चॅट थीम बनेल.
जेव्हा तुम्ही ही थीम बदलता, तेव्हा तुमच्या चॅट बॅकगाऊंड आणि चॅट बबल्स या दोन्हींचा रंग बदलेल. मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टंट मेसेजिंग एप युजर्सना पाच कलर ऑप्शन देऊ शकते. यामध्ये ग्रीन, ब्लू, व्हाईट, पिंक आणि व्हायलेट या रंगांचा समावेश आहे. नंतर त्यात आणखी रंग एड केले जाऊ शकतात.