लवकरच व्हॉट्सअॅप ग्रुप्सना रामराम ठोकावा लागू शकतो. त्याबदल्यात व्हॉट्सअॅप कम्युनिटीज (WhatsApp Communities) फिचर दिले जाऊ शकते किंवा हे दोन्ही फिचर एकत्रिरीत्या अॅपमध्ये दिसू शकतात. व्हॉट्सअॅप सध्या एका नवीन फिचरवर काम करत असल्याची माहिती APK ‘टियरडाउन’ मधून समोर आली आहे. या फिचरचे नाव कॉम्युनिटी असेल आणि व्हॉट्सअॅप ग्रुप्ससह हे फिचर देखील वापरता येऊ शकते.
नवीन कॉम्युनिटी फिचरची माहिती टेक वेबसाईट XDA Developers ने दिली आहे. वेबसाईटने WhatsApp च्या बीटा व्हर्जन 2.21.21.6 च्या एपिके फाईलचे टियरडाउन करून ही माहिती मिळवली आहे. ग्रुप्स व्यतिरिक्त या कम्युनिटी फिचरच्या माध्यमातून सोशल मीडियाचा अंश देण्याचा प्रयत्न कंपनी करू शकते, अशी माहिती रिपोर्टमधून मिळाली आहे. किंवा या फिचरच्या माध्यमातून यूजर्स ग्रुप चॅट संघटित करू शकतील. अजूनतरी या फिचरची अचूक माहिती समोर आलेली नाही. लवकरच या फिचरची माहिती समोर येऊ शकते.
WhatsApp चे नवीन Voice Notes Feature
व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचर्सवर लक्ष ठेऊन असणाऱ्या WABetaInfo या वेबसाईटने या नवीन फिचरची माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार हे फिचर iOS आणि Android साठी WhatsApp Beta च्या आगामी अपडेटमध्ये रोल आउट करण्यात येईल. या अपडेटनंतर युजर व्हॉईस नोट रेकॉर्ड करताना रेकॉर्डिंग पॉज म्हणजे थांबवू शकतात आणि त्यात अजून रेकॉर्डिंग जोडू शकतात. याआधी पॉजचे फिचर नसल्यामुळे छोटे छोटे व्हॉइस नोट पाठवले जायचे. आता एकाच व्हॉइस नोटमधून संपूर्ण मुद्दा मांडता येईल.