WhatsApp चे माजी ग्लोबल बिजनेस हेड नीरज अरोरा यांनी HalloApp नावाच्या नवीन अॅपची निर्मिती केली आहे. नीरज यांच्यासोबत त्यांचे व्हॉट्सअॅपमधील माजी सहकारी मायकल डोनोह्यू देखील आहेत. या दोघांनी व्हॉट्सअॅपमधील आपला अनुभव वापरून जाहिरात-मुक्त, खाजगी सोशल नेटवर्कची निर्मिती केली आहे. हा अॅप ‘रियल-रिलेशनशिप नेटवर्क’ असल्याचे, नीरज यांचे म्हणणे आहे.
नीरज यांनी ट्विटरवरून HalloApp लाँच करण्याची घोषणा केली. पारंपरिक सोशल मीडिया अॅपप्रमाणे हेलो अॅपमध्ये जाहिरात, बॉट, लाइक आणि फॉलोअर्सविना येतो. तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमधील लोकांशी संपर्क साधू शकता. हा प्लॅटफॉर्म आपल्या युजर्सची कोणतीही खाजगी माहिती गोळा करत नाही किंवा वापरत नाही. तसेच या अॅपमधील चॅट्स एंड-टू-एंड इन्क्रिप्टेड असतील. फेसबुक आणि इतर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणे हेलोअॅप अल्गोरिदमचा वापर करत नाही.
हेलोअॅप Apple App Store आणि Google Play Store वरून डाउनलोड करता येईल. सध्यातरी फेसबुकप्रमाणे हा ब्राऊजरमधून वापरता येत नाही. HalloApp वर तुम्हाला फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारखाच अनुभव मिळेल, फक्त जवळच्या मित्र आणि कुटुंबियांशी जोडले जाऊ शकता.