शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

सरकार 3 महिन्यांसाठी देत आहे मोफत इंटरनेट? जाणून घ्या या व्हायरल मेसेजमागील सत्य  

By सिद्धेश जाधव | Published: June 04, 2021 3:31 PM

Government giving free data: WhatsApp वर हा खोटा मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये सरकार मोफत इंटरनेट देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.  

टेक्नॉलॉजीमुळे आपले आयुष्य सुखकर झाले आहे, परंतु काही लोक या टेक्नॉलॉजीचा वापर चुकीच्या कामांसाठी करत असतात. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या बातम्या रोजच येत असतात. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. एक खोटा व्हाट्सअ‍ॅप मेसेज व्हायरल होत आहे, ज्यात सांगण्यात आले आहे कि सरकार तीन महिन्यांसाठी 100 मिलियन म्हणजे 10 कोटी युजर्सना मोफत इंटरनेट देत आहे. प्रेस इंफॉर्मेशन ब्यूरो (PIB) ने हा मेसेज खोटा असल्याचे सांगितले आहे. (Fake WhatsApp message claims free internet for three months) 

PIB ने 1 जूनला फसव्या व्हाट्सअ‍ॅप मेसेजबाबतची माहिती ट्वीट केली. या ट्विटसोबत एक छोटासा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. या मेसेजमध्ये लिहिण्यात आले आहे कि, सरकार मोफत इंटरनेट देत आहे आणि हि ऑफर 29 जूनपर्यंत Jio, Airtel आणि Vi (Vodafone Idea) युजर्ससाठी उपलब्ध आहे. मेसेजमध्ये एक लिंक देखील देण्यात येते. या लिंकवर क्लिक केल्यावर एक वेबसाईट उघडते. या वेबसाइटवर तुम्हाला तुमची खाजगी माहिती टाकून सबमिट करावी लागते. परंतु, असे केल्याने तुमची खाजगी माहिती भरावी चुकीच्या लोकांच्या हातात पडू शकते, त्यामुळे अश्या कुठल्याही लिंकवर क्लिक करणे टाळावे. 

अश्याप्रकारचे फसवे मेसेज सतत व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी एक मेसेज व्हायरल झाला होता, ज्यात WhatsApp Pink मिळवण्याचा दावा केला गेला होता, जो हॅकर्सना युजर्सच्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस मिळवून देत होता. अश्या मेसेजेसना आळा घालण्याचा सोप्पा उपाय म्हणजे तुम्हाला आलेल्या मेसेजची खात्री न करता तो पुढे पाठवणे बंद करणे.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपFake Newsफेक न्यूज