भारतातील लोकप्रिय मेसेंजर WhatsApp चा वापर भारतातील स्मार्टफोन वापरकर्ते मोठ्या प्रमाणावर करतात. या मेसेंजरचा वापर मेसेज, व्हॉइस कॉल्स आणि व्हिडीओ कॉल्स करण्यासाठी केला जातो. यातील टेक्स्ट मेसेज पाठवण्यासाठी इतका मोबाईल डेटा खर्ची पडत नाही परंतु मीडिया फाइल्स, व्हॉइस कॉल्स आणि व्हिडीओ कॉल्स तुमच्या मोबाईल डेटावर मोठा परिणाम करू शकतात. जर तुम्ही देखील डेटाचा वापर कमी करून व्हॉटसअॅपवर व्हॉइस कॉल्स आणि व्हिडीओ कॉल्स करू इच्छित असाल तर पुढे दिलेल्या फीचरचा वापर करा.
WhatsApp वर या फीचरचा वापर कसा करायचा?
व्हॉट्सअॅप वॉयस आणि व्हिडीओ कॉल दरम्यान डेटा वाचवण्यासाठी तुमच्याकडे Android फोनमध्ये अॅपचे लेटेस्ट व्हर्जन 2.21.12.21 असणे आवश्यक आहे. iOS डिवाइसमध्ये अॅपचे 2.21.130.15 व्हर्जन असावे. जर तुमच्याकडे अपडेटेड अॅप नसेल तर ते अपडेट करून घ्या आणि पुढील स्टेप्स फॉलो करा.
- सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये WhatsApp ओपन करा.
- त्यानंतर उजवीकडे असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
- तिथे Settings या ऑप्शनची निवड करा.
- त्यानंतर Storage आणि Data वर क्लिक करा.
- आता तुमच्या स्क्रीनवर Use Less Data for Calls असा ऑप्शन दिसेल तो एनेबल करा.
- आता व्हाट्सअॅप कॉल दरम्यान कमी डेटाचा वापर होईल. Android आणि iOS दोन्ही डिवाइसेससाठी या स्टेप्स फॉलो करा.