शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

आता WhatsApp वरही जाहिराती दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 12:13 PM

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. मात्र आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर जाहिराती देखील दिसणार आहेत.

ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच जाहिराती देखील दिसणार आहेत.2020 पासून व्हॉट्सअ‍ॅपवर जाहिराती दिसणार असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे. सुरुवातीला व्हॉट्सअ‍ॅप स्टोरी स्टेक्शनमध्ये या जाहिराती दाखवण्याचा कंपनीचा प्लॅन आहे.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच जाहिराती देखील दिसणार आहेत. सोशल मीडियामध्ये अनेक ठिकाणी जाहिराती दिसत होत्या. पण आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपवर जाहिराती दाखवल्या जात नव्हत्या. 2020 पासून व्हॉट्सअ‍ॅपवर जाहिराती दिसणार असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे. 

नेदरलँडमध्ये दरवर्षी होणाऱ्या मार्केटींग समिटमध्ये फेसबुकने 2020 मध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर जाहिराती दिसण्यास सुरुवात होईल अशी माहिती दिली आहे. सुरुवातीला व्हॉट्सअ‍ॅप स्टोरी स्टेक्शनमध्ये या जाहिराती दाखवण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. याचा एक डेमो देखील दाखवण्यात आला. यामध्ये जाहिरात ही पूर्ण स्क्रीन दिसणार असून त्यामध्ये एक लिंक देण्यात येईल. हे स्वाईप केल्यावर युजर्स डायरेक्ट त्या लिंकवर जाऊ शकतात. सध्या अशा जाहिराती इन्स्टाग्रामवर दिसत आहेत तर व्हॉट्सअ‍ॅपही लवकरच यावर काम करत आहे. 

फक्त एक सेटींग बदला, WhatsApp वर ऑटो सेव्ह होणार नाहीत फोटो

WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने फोटो, व्हिडीओ, ऑडीओ, डॉक्यूमेंट्स शेअर करता येतात. व्हॉट्सअ‍ॅपच्या अनेक ग्रुपमध्ये युजर्स अ‍ॅड असतात. त्या ग्रुपमध्ये सातत्याने मेसेज, फोटो अथवा व्हिडीओ हे येत असतात. मात्र हे फोटो स्मार्टफोनच्या गॅलरीमध्ये ऑटो सेव्ह होतात. आपोआप सेव्ह झालेल्या गोष्टींमुळे फोनची मेमरी लवकर भरते. तसेच युजर्सना ही नको असलेले फोटो डिलीट करावे लागतात. व्हॉट्सअ‍ॅपवर आपोआप सेव्ह होणारे हे व्हिडीओ आणि फोटो अनेकदा युजर्सना नको असतात. मात्र या समस्येने ग्रस्त असलेल्या युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. स्मार्टफोनमध्ये फक्त एक सेटींग बदलून या समस्येपासून त्यांची सुटका होणार आहे. यामुळे आपोआप फोटो अथवा व्हिडीओ फोनमध्ये सेव्ह होणार नाहीत. अँड्रॉईड स्मार्टफोन आणि आयफोनमध्ये सेटींग बदलून असे करता येणार आहे. 

जाणून घ्या WhatsApp चे 9 सिक्रेट्स; वाढेल चॅटिंगचा आनंद

स्क्रीनशॉट न घेता असं सेव्ह करा WhatsApp स्टेटसइन्संट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपचं स्टेटस फीचर अत्यंत लोकप्रिय झालं असून युजर्सच्या ते आवडीचं आहे. या फीचरच्या मदतीने एखाद्या लिंकपासून ते व्हिडीओ, मीम्स, फोटो, हॉलीडे डेस्टीनेशनसारख्या सर्व गोष्टी शेअर करता येतात. यातील अनेक स्टेटस हे हवे असल्याने ते सेव्ह करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये स्क्रीनशॉट काढला जातो. मेसेजिंग अ‍ॅपमध्ये स्टेटस सेव्ह करण्याचा कोणताही पर्याय देण्यात आलेला नाही. मात्र हे स्टेटस सेव्ह करण्यासाठी काही ट्रिक्स आहेत.

सावधान! एक WhatsApp कॉल उडवणार सर्व डेटा; असा करा बचाव

व्हॉट्सअ‍ॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने अनेक जण त्याचा वापर करत असतात. व्हॉट्सअ‍ॅपही आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करण्याची अनेकदा माहिती मिळते. मात्र युजर्स ती गोष्ट टाळतात. पण युजर्सची ही एक छोटीशी चूक त्यांना महागात पडू शकते. त्वरीत व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करा कारण व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक बग सापडला आहे. Whatsapp कॉलच्या माध्यमातून हा बग स्पायवेअर इन्स्टॉल करण्याची परवानगी देतो. म्हणजेच स्मार्टफोनवर येणारा एखादा कॉल देखील धोकादायक ठरणार आहे. मग तो कॉल युजर्सने केला असेल अथवा युजर्सने तो रिसीव्ह केला असेल तरी त्याचा फटका बसणार आहे. फोनमधील सर्व डेटा, कॉल लॉग, ईमेल, मेसेज, फोटो, व्हिडीओ या सर्व गोष्टी बगमुळे डिलीट होऊ शकतात. 

WhatsApp युजर्ससाठी Bad News; आता 'हे' खास फीचर मिळणार नाही

WhatsApp वर आलं नवं फीचर; नोटीफिकेशनमध्ये दिसणार स्टीकर्स 

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी स्टीकर्स फीचरमध्ये अपडेट आणत आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येणाऱ्या या नव्या अपडेटमध्ये ‘Sticker Notification Preview’ नावाचं नवं फीचर पाहायला मिळणार आहे. आयओएसच्या बीटा व्हर्जन 2.19.50.21 मध्ये हे फीचर देण्यात आले आहे. आता लवकरच अँड्रॉईड बीटावर देखील ते पाहायला मिळणार आहे.  ‘Sticker Notification Preview’ हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपवर आल्यानंतर अ‍ॅपवर एखादा मेसेज, स्टीकर, फोटो, व्हिडीओ आल्यावर नोटीफिकेशनमध्ये टेक्स्ट आणि इमोजी येणार आहे. स्टीकरसाठी नोटीफिकेशन बारमध्ये सध्या स्टीकर असं लिहिलेलं दिसतं. मात्र आता या नव्या फीचर नंतर युजर्सना पाठवलेला स्टीकर दिसणार आहे. तसेच मेसेज ओपन न करता कोणता स्टीकर पाठवण्यात आला आहे ते पाहता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचं नवं अपडेट गुगल प्ले स्टोरवर बीटा प्रोग्रामचा वापर करणाऱ्या युजर्ससाठी आले आहे. या व्हर्जनमध्ये स्टीकर प्रिव्यू फीचरची चाचणी करण्यात येत आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅप Animated stickers वर देखील काम करत असल्याची माहिती मिळत आहे. 

 

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान