WhatsApp भारतातील सर्वाधिक वापरला जाणारा इंस्टेंट मेसेंजर आहे. फक्त खाजगी गप्पांसाठी नव्हे तर आपल्या व्यावसायिक जीवनात देखील या मेसेंजरनं शिरकाव केला आहे. परंतु कोणत्याही स्मार्टफोनवर कायमस्वरूपी व्हॉट्सअॅप मिळत नाही. सिक्योरिटीसाठी व्हॉट्सअॅप वेळोवेळी अशा फोन्सची लिस्ट जारी करतो ज्यात कंपनीच्या सेवा बंद केल्या जातात.
या फोन्समध्ये व्हॉट्सअॅपचा वापर करता येत नाही. आता 2022 मध्ये व्हॉट्सअॅपनं त्या फोन्सची यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यात कंपनीच्या सेवा दिल्या जाणार नाहीत. त्यामुळे जर तुम्ही देखील हे फोन्स वापरत असाल तर तम्ही या फोन्समध्ये व्हॉट्सअॅप वापरू शकणार नाहीत. व्हॉट्सअॅपनुसार, अँड्रॉइड ओएस 4.1 ऑपरेटिंग सिस्टम किंवा त्या आधीचे ओएस असलेल्या अँड्रॉइड फोन्समध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार आहे.
तसेच तुमच्याकडे iOS 9 किंवा त्यापेक्षा जुनी ऑपरेटिंग सिस्टम असलेले iPhones असतील तर तुम्हाला व्हॉट्सअॅपसाठी स्मार्टफोन बदलावा लागू शकतो. तुम्ही तुमची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करून देखील व्हॉट्सअॅप वापरू शकता. परंतु जर अपडेट उपलब्ध नसेल तर तुम्हाला व्हॉट्सअॅपसाठी नवीन स्मार्टफोन घ्यावाच लागेल. विशेष म्हणजे या यादीत 2018 मध्ये आलेल्या जियोफोन 2 चा देखील समावेश आहे.
2022 मध्ये पुढील स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही.
- एचटीसी डिजायर 500
- सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड लाईट
- सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड 2
- सॅमसंग गॅलेक्सी एस3 मिनी
- सोनी एक्सपीरिया एम
- सॅमसंग गॅलेक्सी एक्सकव्हर 2
- एलजी लूसिड 2
- एलजी ऑप्टिमस एफ7
- एलजी ऑप्टिमस एल3 2
- एलजी ऑप्टिमस एल5
- एलजी ऑप्टिमस एल3
- एलजी ऑप्टिमस एल7
- एलजी ऑप्टिमस एफ6
- एलजी इनॅक्ट
- एलजी ऑप्टिमस एल4, ड्युअल
- एलजी ऑप्टिमस एफ 3
- हुवावे एसेंड जी740
- लेनोवो ए820
- हुवावे एसेंड डी2
- हुवावे एसेंड मेट
- सॅमसंग गॅलेक्सी कोर
- सॅमसंग गॅलेक्सी एस 2
- जियोफोन, जियोफोन 2
- आयफोन एसई 16,32 64 जीबी
- आयफोन 6एस 16, 32, 64 आणि 128 जीबी
- आयफोन 6एस प्लस 16, 32, 64 आणि 128 जीबी