भारतीयांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप सापडणार नाही असे होऊच शकणार नाही. एसएमएस, एमएमएसची हवाच या सोशल मेसेंजिग अॅपने काढून टाकली आहे. परंतू, जगभरात प्रसिद्ध असेलेले हे WhatsApp आता डोकेदुखी ठरू लागले आहे. कारण बॅकअपसह मीडियासाठी एवढी स्पेस खातेय की हळूहळू मोबाईलमधील स्टोरेज संपू लागले आहे. कंपनीचे ग्रुप, फॅमिलीचे ग्रुप, मित्र-मैत्रिणींचे ग्रुप यासह सोसायटी, पक्ष आदी ग्रुप असा मेसेजचा ढिगाराच आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये साचू लागला आहे. फेसबुकने म्हटल्यानुसार जगभरातून 100 अब्ज मेसेज दिवसाला पाठविले जात असतात. आता तुम्हाला सर्वाधिक मेसेज कोणाचे, कोणाचे मेसेज जास्त जागा खातात हे देखील पाहता येणार आहे.
बहुतांशवेळा टेक्स्ट मेसेज काही केबीमध्ये जागा घेतात. तर व्हिडीओ, इमेज आणि अन्य फाईल्स हे प्रचंड जागा व्यापतात. ही जागा काही जीबीमध्ये संपविलेली असते. मग मोबाईलवर सारखा मेसेज येतो स्टोरेज स्पेस मूव्हड आऊट. आता छोट्या छोट्या आणि असंख्य फआील्स असल्याने त्या डिलीट कशा करायचा हा देखील प्रश्न असतो. ओल्याबरोबर सुके जळते त्याप्रमाणे निरुपयोगी फाईलबरोबर उपयोगाची फाईल डिलीट होण्य़ाची शक्यता आहे. हे संकट आणखी स्टोरेज स्पेस खात राहते. जर तुम्ही “Media auto-download” option इनेबल केला असेल तर प्रत्येक चॅटवर आलेली फआील डाऊनलोड करतो. यामुळे नको असलेले चॅट वेळच्या वेळी डिलीट करणे याकडेच साऱ्यांचा कल असतो.
कोण किती जागा खातेय हे पाहण्यासाठी व्हॉट्सअॅप तुमच्या मदतीला आले आहे. यासाठी खाली स्टेप दिलेल्या आहेत. जाणून घ्या...
स्टेप १. व्हॉट्सअॅप ओपन केल्यावर तीन डॉटवर क्लिक करा. हे आयक़ॉन वरील डाव्या बाजुला असतात. यानंतर सेटिंगवर क्लिक करा.
स्टेप २. सेटिंगमध्ये “Data and Storage Usage” ऑप्शन आहे. यावर तुम्ही अॅपने फोन स्टोरेज किती वापरले गेले आहे ते पाहू शकता.
स्टेप ३. याच ऑप्शनमध्ये तुम्हाला मॅनेज स्टोरेज ऑप्शन दिसतो. तुमच्या मोबाीलवर किती फोटो, व्हिडीओ, जीआयएफ आणि अन्य फाईल आल्या आहेत याची जंत्रीच मिळते. व्हॉट्सअॅप तुम्हाला “Free up space” चा पर्याय देते. तुम्हाला जर त्या फाईल डिलीट कराव्या वाटत असतील तर त्या तुम्ही त्यावर क्लिक करून डिलीट करू शकता. परंतू जर तुम्हाला कोणी कोणती फाईल पाठवली हे चेक करायचे असेल तर त्या कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपवर जाऊन चेक करावे लागणार आहे. ही लिस्ट खालीच उपलब्ध होते. यावरन गरजेची नसलेली फाईल डिलीट करता येणार आहे.