WhatsApp वर युजर्सची प्रायव्हसीसाठी अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत. या लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍपवर युजर्स आपल्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी शेयर करतात, त्यामुळे अनेकदा काही गोष्टी फक्त नेमक्याच लोकांशी शेयर करता याव्यात असं वाटत. यात WhatsApp वर डिस्प्ले फोटो किंवा प्रोफाईल फोटोचा समावेश आहे.
आपला कॉन्टॅक्ट नंबर अनेकांना दिलेला असतो. परंतु यातील काही लोकांना नाईलाज म्हणून नंबर द्यावा लागतो. हे लोक तुमचा नंबर सेव्ह करून तुमचा प्रोफाईल फोटो बघू शकतात. तुम्ही अशा लोकांनापासून तुमचा डीपी लपवू शकता. यासाठी त्यांचा नंबर सेव्ह करून ब्लॉक करण्याची गरज नाही.
WhatsApp वर प्रोफाईल पिक्चर कसं हाईड करायचं?
- सर्वप्रथम व्हॉट्सअॅप ओपन करा
- उजवीकडे वरच्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्सवर क्लीक करून Settings वर जा.
- त्यानंतर Account मध्ये जाऊन Privacy वर क्लिक करा.
- इथे प्रोफाईल फोटोवर टॅप करा.
- डिफॉल्ट सेटिंगमध्ये तुमचा प्रोफाईल फोटो Everyone म्हणजे सर्वाना दिसतो.
- तुम्ही ही सेटिंग फक्त तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेल्या लोकांपुरती मर्यादित करू शतक. यासाठी तुम्हाला ही सेटिंग My Contact वर ठेवावी लागेल.
- जर कॉन्टॅक्ट्सना देखील प्रोफाइल पिक्चर दाखवायचं नसेल तर No One पर्याय निवडा.
- प्रोफाईल फोटो हाईड झाल्यावर त्याजागी ग्रे कलरचा आयकॉन दिसेल.
हे देखील वाचा:
- 7 मार्चला लो बजेटमध्ये वादळ येणार; 5000mAh बॅटरी आणि शानदार कॅमेऱ्यासह Realme C35 घेणार एंट्री
- रेडमी-रियलमीला म्हणाल ‘चल...’! 7,000mAh बॅटरी आणि 6GB RAM सह ‘ही’ कंपनी आणतेय लो बजेट फोन
- लॅपटॉपवरही मिरवा Apple चा लोगो! 31 हजारांच्या जबरदस्त डिस्काउंटसह शक्तिशाली MacBook लॅपटॉप उपलब्ध