गेल्या काही महिन्यांत ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रिपोर्टनुसार, अनोळखी लोकांचे कॉल किंवा मेसेज आल्यानंतर हजारो लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आता या लोकांनी WhatsApp वरून फसवणूक करायला सुरुवात केली आहे. अनेक सिक्युरिटी फीचर्स असूनही लोक जाळ्यात अडकतात. WhatsApp वर आता आपण कोणत्याही अनोळखी व्यक्तीला थेट नोटिफिकेशनवरून किंवा फोन लॉक असतानाही ब्लॉक करू शकतो.
जर कोणी तुम्हाला संशयास्पद मेसेज पाठवत असेल, जसं की कोणीतरी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुम्हाला खोटी आश्वासनं देऊन आमिष दाखवत असेल, तर तुम्ही त्यांना दोन टॅपनमध्ये लगेचच ब्लॉक करू शकता. नोटीफिकेशन आल्यावर, रिप्लाय बटणाच्या पुढे "ब्लॉक" बटण असेल. तुम्ही तुमचा फोन लॉक केला असला तरीही, तुम्ही त्या व्यक्तीला थेट नोटिफिकेशनमधूनच ब्लॉक करू शकता.
WhatsApp मध्ये ब्लॉक आणि रिपोर्टचा ऑप्शन आधीच होता. मात्र आता नवीन फीचर आलं आहे. याआधी WhatsApp अनोळखी नंबरवरून आलेल्या संशयास्पद मेसेजवर इशारे देत असे, पण त्यांना ब्लॉक करण्यासाठी चॅट ओपन करावं लागत होतं. यामुळे समस्या निर्माण झाल्या आणि अनेक वेळा लोक स्पॅम मेसेज ब्लॉक करत नाहीत किंवा चॅट उघडून ते ब्लॉक करायला विसरतात. आता नवीन फीचरमुळे थेट नोटिफिकेशन पाहून स्पॅमर्सना ब्लॉक करता येणार आहे, त्यासाठी फोन ओपन करण्याची गरज नाही.
WhatsApp सिक्याोरिटी फीचर्स
टू-स्टेप व्हेरिफिकेशन - तुमचं WhatsApp हॅक होण्यापासून वाचवण्यासाठी 6-अंकी पिन एंटर करा.
डिसेपियेरिंग ऑप्शन्स - फोटो, व्हिडीओ आणि व्हॉईस नोट 'व्ह्यू वन्स' म्हणजेच एकदाच पाहिले जाईल अशा पद्धतीने पाठवा. गोष्टी आणखी खासगी ठेवायच्या असल्यास डिसेपियेरिंग ऑप्शन्सचा वापर करा.
चॅट लॉक - तुम्ही तुमचे महत्त्वाचे चॅट वेगळ्या पासवर्डने लॉक करू शकता. जर कोणी तुमचा फोन पाहिला तरी तो ते चॅट्स पाहू शकणार नाही.
अनोळखी कॉलर - अनोळखी नंबरचा त्रास होऊ नये म्हणून ते सायलेंट करा.
प्रायव्हसी चेकअप - WhatsApp मध्ये प्रायव्हसी चेकअप नक्की करा. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी कोणते फीचर्स योग्य आहेत आणि तुम्ही ती चालू करू शकता.