फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमध्ये सतत नवनवीन बदल होत असतात. हे बदल अॅपचा वापर सोप्पा आणि सुखकर व्हावा म्हणून केले जातात. असेच एक नवीन फिचर कंपनीने आपल्या कोट्यावधी युजर्ससाठी आणेल आहे. या नवीन फीचरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप युजर्स कोणताही ग्रुप व्हिडीओ किंवा व्हॉईस कॉल सुटल्यावर देखील पुन्हा जॉइन करू शकतील. व्हॉट्सअॅपने नवीन ग्रुप कॉल फीचर सोमवारपासून अँड्रॉइड आणि आयओएससाठी रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच हे फिचर सर्व डिवाइसवर अपडेटच्या माध्यमातून येईल. (WhatsApp will let you join group calls after they start)
Joinable Group Calls फीचर
व्हॉट्सअॅपने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे कि, हे नवीन फीचर आल्यामुळे युजर्सवर ग्रुप कॉल येताच जॉईन करण्याचा दबाव राहणार नाही. हे फिचर येण्याच्या आधी तुम्ही एखादा व्हॉट्सअॅप ग्रुप व्हिडीओ किंवा व्हॉईस कॉल मिस केला कि त्यात स्वतःहून जॉईन होता येत नव्हते. त्या ग्रुप कॉलमध्ये जाण्यासाठी कॉल मेंबर्सनी पुन्हा अॅड करणे आवश्यक होते.
परंतु आता व्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉल सुटला तर तुम्हाला एक नवीन पर्याय देण्यात येईल. जर ग्रुप कॉल सुरु असेल तर तुम्ही व्हॉट्सअॅपच्या Call log मध्ये जाऊन Tap To Join ऑप्शनवर क्लिक करू शकता. या ऑप्शन वर क्लिक केल्यावर तुम्ही ग्रुप कॉलमध्ये अॅड व्हाल. तसेच तुम्ही सुरु असलेला ग्रुप कॉल सोडून तो पुन्हा काही वेळाने जॉईन करू शकता, फक्त तो ग्रुप कॉल सुरु असणे आवश्यक आहे. व्हॉट्सअॅपने एक नवीन Call Info स्क्रीन देखील आणली आहे जी कोणत्या युजरने इन्व्हाईट करून देखील कॉल जॉईन केला नाही हे दाखवेल.
WhatsApp HD Photo फिचर
अलीकडेच व्हॉट्सअॅपने एचडी फोटो फीचरचा देखील समावेश केला आहे. या फिचरच्या माध्यमातून तुम्ही फोटो पाठवताना त्याची क्वालिटी निवडू शकता. अँड्रॉइड बीटा टेस्टर्सना क्वालिटीसाठी तीन वेगवेगळे पर्याय मिळत आहेत. यात बेस्ट क्वालिटी, ऑटो आणि डेटा सेव्हर अश्या तीन पर्यायांचा समावेश आहे. हे फिचर सर्वांसाठी कधी उपलब्ध होईल याची माहिती मात्र अजून समोर आली नाही.