नवी दिल्ली - लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे. एखादा फोटो, व्हिडीओ किंवा अन्य काही महत्त्वाचे डॉक्यूमेंट्स पाठवण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर केला जातो. मात्र कधी कधी व्हॉट्सअॅप ग्रूप अनेक असल्याने त्यावर येणाऱ्या असंख्य नोटिफिकेशन्सचा कंटाळा देखील येतो.
व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या युजर्ससाठी एक जबरदस्त फीचर आणणार आहे. यामुळे नको असलेल्या नोटिफिकेशन्सच्या त्रासापासून युजरची सुटका होणार आहे. या नव्या फीचरमुळे युजर्सना ग्रुप नोटिफिकेशन्स कायमचं Mute करता येणार आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपच्या लेटेस्ट बीटा फॉर अँड्रॉईड व्हर्जन 2.20.197.3 मध्ये mute always ऑप्शन देण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप ग्रुपचं नोटिफिकेशन म्यूट करण्यासाठी युजर्सना एका वर्षाचा ऑप्शन देण्यात आला आहे. त्याजागी Mute always’हा ऑप्शन मिळणार आहे. याआधी 1 year, 8 hours आणि 1 week असे ऑप्शन देण्यात आले आहेत. व्हॉट्सअॅप युजर जोपर्यंत आपल्या फोनमध्ये सेटींग चेंज करत नाहीत तोपर्यंत हे नोटिफिकेशन्स म्यूट राहणार आहे.
व्हॉट्सअॅपवर अनेक युजर्सचे असंख्य ग्रुप आहेत. मात्र त्यामध्ये असे काही ग्रुप असतात की जे खरं तर लेफ्ट करण्याची इच्छा असते. मात्र काही कारणास्तव करू शकत नाही अशा युजर्ससाठी व्हॉट्सअॅपचं हे नवं जबरदस्त फीचर अत्यंत उपयुक्त असणार आहे. याआधी ग्रुप नोटिफिकेशन एका वर्षासाठी म्यूट करण्याचा ऑप्शन देण्यात आला होता. पण आता कायमचंच म्यूट करता येणार आहे. व्हॉट्सअॅप ग्रुप म्यूट केला असला तरी त्यावर येणारे मेसेज युजर्सना वाचता येतात. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : बाबो! क्वारंटाईन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या जेवणाचं बिल आलं तब्बल 50 लाख
CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात तब्बल 10 लाख लोकांनी जिंकली कोरोनाची लढाई
CoronaVirus News : बापरे! उंच लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा
SSC Result 2020 : दहावीचा निकाल थेट 18 टक्क्यांनी वाढला; जाणून घ्या, 'मार्कांचा पाऊस' कसा पडला!
दिलदार सुपरहिरो! नोकरी गेली, इंजिनिअरवर भाजी विकण्याची वेळ आली; सोनू सूदने दिला मदतीचा हात
"नोकरी हिसकावली, जमवलेले पैसे हडपले, कोरोना रोखू शकले नाही मात्र 'ते' खोटी स्वप्न दाखवत राहिले"