मुंबई : सोशल मीडियामधील व्हॉट्सअॅप हे बहुपयोगी माध्यम बनले आहे. अगदी छोट्या मोठ्या माहितीपासून ते कागदपत्रे, छायाचित्रे, व्हिडिओ पाठवण्यासाठी मोबाइलमधील व्हॉट्सअॅपचा सर्रास वापर केला जाते. पण आता दुसऱ्याचे आलेले मेसेज आपल्या नावावर खपवणाऱ्यांनो सावध राहा. कारण व्हॉट्सअॅप एक नवे फिचर घेऊन येत आहे. याद्वारे दुसऱ्यांचा डाटा आपल्या नावावर फॉरवर्ड करणाऱ्यांचे पितळ उघडे पडणार आहे. तुम्ही जर एखादाचा मेसेज स्वत:च्या नावावर फॉरवर्ड केल्यास त्यावर 'Forwarded Message' असा मजकूर लिहून येणार आहे. त्यामुळे हा मेसेज कुणाचा तरी फॉरवर्ड केलाय, हे स्पष्ट होणार आहे.
व्हॉट्सअॅप या नव्या फिचरमधून अफवा पसरवणाऱ्यांनाही धडा शिकवणार आहे. सध्या व्हॉट्सअॅप यावर काम सुरु आहे. याची टेस्ट बिटा वर्जन 2.18.67 वर सुरु आहे. याशिवाय फिचरचा विंडोज व्हॉट्सअॅपमध्येही समावेश करण्यात आला असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
सध्या अँड्रॉईड आणि विंडोजच्या बीटा युजर्सना हे फिचर चाचणीसाठी देण्यात आलं आहे. या फिचरनंतर ग्रुपचं डिस्क्रीप्शन बदलणंही शक्य होणार आहे. त्याचं नोटीफिकेशनही व्हाटसअॅप ग्रुपमधील सर्वांना मिळण्याची सुविधा या नव्या फिचरमध्ये देण्यात आली आहे. जगांमध्ये 1.5 अरब व्हॉट्सअॅप वापरणारे लोक आहेत. त्यामध्ये 20 कोटी भारतात आहेत. जगातील सर्वाधिक व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यात भारत अव्वल आहे. 1.5 अरब यूजर्स दिवसांला 60 अरब मेसेज एकदुसऱ्याला पाठवतात.