WhatsApp ने चॅट बॅकअपसाठी नवीन एन्ड-टू-एन्ड इन्क्रिप्शन फीचर रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. हे फिचर iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्म्ससाठी उपलब्ध होईल. या फीचरमुळे iCloud आणि Google Drive वर अपलोड होणाऱ्या चॅट बॅकअपला अतिरिक्त सुरक्षा लेयर मिळेल. या फिचरमुळे युजर्सच्या डिजिटल कन्वर्सेशनसाठी आणि जास्त प्रायव्हसी आणि सिक्युरिटी मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे.
या फीचरच्या माध्यमातून आपण आता युजर्सना संपूर्ण एन्ड-टू-एन्ड इन्क्रिप्शन मेसेजिंग एक्सपीरियंस देत आहोत, असे मार्क झुकरबर्गने म्हटले आहे. चॅट बॅकअपसाठी तुम्हाला एक 64 डिजिट इन्क्रिप्शनची निवड करावी लागेल, जो फक्त तुम्हाला माहित असेल. फक्त तुम्ही तुमचा चॅट बॅकअप या 64 डिजिट कोडने अनलॉक करू शकाल.
अशाप्रकारे क्रिएट करा इन्क्रिप्टेड बॅकअप
- सर्वप्रथम WhatsApp सेटिंग्स मध्ये जा.
- त्यानंतर चॅटवर टॅप करा आणि चॅट बॅकअपवर जा.
- मग एन्ड-टू-एन्ड इन्क्रिप्टेड बॅकअपवर क्लिक करा.
- आता पुढे जाण्यासाठी कन्टिन्यूवर टॅप करा आणि पासवर्ड किंवा ‘की’ क्रिएट करा.
- प्रोसेस पूर्ण झाल्यावर ‘done’ वर टॅप करा. आता तुमच्या WhatsApp चॅट बॅकअपसाठी एन्ड-टू-एन्ड इन्क्रिप्शन सुरु होईल.
महत्वाची सूचना: या प्रक्रियेसाठी स्मार्टफोन चार्जवर लावणे आवश्यक आहे, असे व्हॉट्सअॅपने सांगितले आहे.
अशाप्रकारे इन्क्रिप्टेड चॅट बॅकअप बंद करा
- WhatsApp सेटिंग्समध्ये जा.
- त्यानंतर चॅट्सवर टॅप करा आणि चॅट बॅकअपवर टॅप करा.
- आता एन्ड-टू-एन्ड इन्क्रिप्टेड चॅट बॅकअपवर टॅप करा.
- त्यांनतर हा ऑफ करण्याचा पर्याय मिळेल, त्यावर टॅप करा. आता तुमचा पासवर्ड टाका आणि हे प्रोटेक्शन बंद करा.