WhatsApp हे एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग Appआहे. फॅमिली असो किंवा ऑफिस प्रत्येक ठिकाणी कॉन्टॅक्ट करण्याचं हे बेस्ट साधन आहे. युजर्सचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी WhatsApp आपल्या प्लॅटफॉर्मवर नवनवीन फीचर्स आणत असतं. आता लवकरच युजर्सना WhatsApp वर कॉन्टॅक्ट मॅनेजरची सुविधा मिळणार आहे.
WhatsApp वर हे फीचर आल्यानंतर युजर्स अगदी सहजपणे आपले कॉन्टॅक्ट्स मॅनेज करू शकतात. युजर्सचा चॅटिंग एक्सपीरियन्स आणखी चांगला होणार आहे. कॉन्टॅक्ट्स मॅनेजर फीचर अंतर्गत तुम्ही कोणत्याही डिव्हाईसवरून तुमचे कॉन्टॅक्ट्स मॅनेज करू शकता. यासाठी तुम्हाला मोबाईलचीही गरज भासणार नाही.
कंपनी सुरुवातीला हे फीचर WhatsApp वेब आणि विंडोज प्लॅटफॉर्मसाठी आणणार आहे. Meta च्या मते, आता तुम्ही डेस्कटॉप किंवा इतर लिंक केलेल्या डिव्हाईसच्या मदतीने कॉन्टॅक्ट सेव्ह करू शकाल. WABetaInfo या WhatsApp फीचरला ट्रॅक करणाऱ्या वेबसाइटने या अपकमिंग फीचरचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
यापूर्वी अनेक युजर्सना कॉन्टॅक्टबाबत समस्या येत होत्या कारण WhatsApp फोनबुकचं कॉन्टॅक्ट एक्सेस करत होतं. फोन कॉन्टॅक्ट्समधून नंबर डिलीट केल्यानंतर ते नाव WhatsApp वरूनही गायब व्हायचं. आता WhatsApp मध्ये सेव्ह केलेले कॉन्टॅक्ट ऑटोमेटीक दुसऱ्या डिव्हाईसमध्ये मिळतील.