शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
3
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
4
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
5
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
6
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
7
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
8
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
9
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
10
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
11
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
12
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
13
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
14
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
15
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
16
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
17
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
18
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
19
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
20
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  

WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 8:15 PM

WhatsApp : व्हॉट्सॲप अनेक नवीन फीचर्सवरही काम करत आहे, जे सध्या बीटा व्हर्जनमध्ये आणले आहे.

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप (WhatsApp) युजर्स आता मोठे व्हॉईस मेसेज पाठवू शकणार आहेत. मेटा कंपनीने आपल्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मसाठी हे नवीन फीचर्स जारी केले आहे. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. युजर्स आता आपल्या स्टेटसमध्ये 1 मिनिटाचे व्हॉईस मेसेज ॲड शकतील. 

याशिवाय, व्हॉट्सॲप अनेक नवीन फीचर्सवरही काम करत आहे, जे सध्या बीटा व्हर्जनमध्ये आणले आहे. व्हॉट्सॲपच्या या नव्या फीचरमुळे युजर्सचे बरेच टेन्शन संपले आहे. आता युजर्स एकाच वेळी स्टेटसमध्ये मोठे व्हॉईस मेसेज टाकू शकतात. यापूर्वी युजर्सना व्हॉईस मेसेज स्टेटसमध्ये फक्त 30 सेकंद ठेवता येत होते. त्यामुळे त्यांना दोन भागात व्हॉईस मेसेज पाठवावे लागत होते. 

दरम्यान, हे फीचर्स टप्प्याटप्प्याने जारी करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये स्टेटसमध्ये 1 मिनिटाचा व्हॉईस मेसेज शेअर करण्याचा पर्याय मिळत नसेल, तर तुमचे ॲप लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट करा. व्हॉट्सॲपने हे फीचरला स्डँडर्ड तसेच बिझिनेस अकाउंट युजर्ससाठी जारी केले आहे. 

असा करा वापर.... - सर्वात आधी तुमच्या फोनमधील व्हॉट्सॲप अपडेट करा.- यानंतर ॲप ओपन करा.- त्यानंतर खालील Updates टॅबवर जा.- आता तुम्हाला येथे Plus आयकॉन किंवा Pencil आयकॉनवर टॅप करावे लागेल.- यानंतर तुम्हाला तळाशी उजव्या बाजूला एक Pencil आयकॉन दिसेल.- त्यावर टॅप करताच तुम्हाला व्हॉईस रेकॉर्ड करून शेअर करण्याचा पर्याय मिळेल.- अशा प्रकारे तुम्ही व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये 1 मिनिटाचा व्हॉइस मेसेज शेअर करू शकाल.

दरम्यान, जर हे फीचर तुमच्या स्मार्टफोनमध्ये अजून उपलब्ध नसेल तर तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागेल. येत्या काही दिवसात तुम्हाला हे फीचर मिळण्यास सुरुवात होईल. यानंतर, तुम्ही वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करून स्टेटसमध्ये 1 मिनिटाचा व्हॉईस मेसेज शेअर करू शकाल. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान