व्हॉट्सअॅपनं आपल्या युजर्सना एक शानदार भेट देत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मेंबर्स जोडण्याची संख्या दुप्पट केली आहे. व्हॉट्सअॅपवर आता एक नवीन अपडेट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे युजर्सना 512 मेंबर्स असलेला एक ग्रुप बनवता येईल. सध्या ही मर्यादा 256 मेंबर्स इतकी आहे आणि आता व्हॉट्सअॅप ग्रुप चॅटमध्ये मेंबर्सची संख्या दुप्पट करण्यात आली आहे.
या फीचरची घोषणा मे मध्ये करण्यात आली. तेव्हा ग्रुप चॅटमध्ये 2GB पर्यंतची फाईल शेयर, मेसेज रिअॅक्शन आणि इतर अनेक फीचर्सची घोषणा करण्यात आली होती. यातील रिअॅक्शन्स आणि 2GB फाईल शेयरिंग हे फीचर्स अँड्रॉइड, आयओएस आणि डेस्कटॉपवरील सर्व युजर्ससाठी उपलब्ध झाले आहेत. WAbetainfo च्या रिपोर्टनुसार ग्रुप चॅटमध्ये 512 पार्टिसिपेंट्स अॅड करण्याचं फिचर देखील रोलआउट झालं आहे.
सर्वांसाठी उपलब्ध
नवीन फिचर आता अँड्रॉइड व्हॉट्सअॅप बीटा 2.22.3.1.10 आणि आयओएस व्हॉट्सअॅप बीटा 22.12.0.73 युजर्ससाठी उपलब्ध झालं आहे. तसेच आजपासून सर्व व्हॉट्सअॅप युजर्स (नॉन-बीटा युजर्स) साठी देखील हे फिचर उपलब्ध होईल. सुरुवातीला 128 मेम्बर्स जोडण्याची सोय व्हॉट्सअॅपमध्ये देण्यात आली होती, ती वाढवून 256 करण्यात आली होती. आता ही संख्या दुप्पट करत 512 मेंबर्स व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
जरी हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध झालं असलं तरी काही युजर्सना हे उशिरा मिळू शकतं. त्यामुळे जर तुमचा एखाद्या ग्रुपमध्ये 512 मेम्बर्स जोडण्याचा प्रयत्न यशस्वी होत नसेल तर तुम्ही 24 तास वाट बघून पुन्हा प्रयत्न करू शकता. नवीन फिचर मिळवण्यासाठी अँड्रॉइड आणि आयओएस अॅप स्टोरवर व्हॉट्सअॅप अॅप अपडेट चेक करा. अपडेट असल्यास अपडेट करून घ्या.