WhatsApp हे आज जगातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मल्टीमीडिया मेसेजिंग एप आहे. WhatsApp वर फोटो, व्हिडीओ, महत्त्वाच्या फाइल्स आणि ऑडिओ मेसेजचा समावेश असतो, पण तुम्हाला माहीत आहे का की, WhatsApp आता हॅकर्सच्या यादीत सर्वात वर आहे. WhatsApp वर एखाद्याशी फसवणूक करणे खूप सोपं झाले आहे. सोप्या पद्धतीने अकाउंट हॅक करता येतं. त्याबद्दल जाणून घेऊया...
या घोटाळ्यात, स्कॅमर प्रथम तुम्हाला तुमच्या मित्रांपैकी एकाच्या नावाने मेसेज पाठवतात आणि दावा करतात की तुमचा मित्र अडचणीत आहे. अनेक वेळा हे हॅकर्स तुमच्या मित्राच्या नंबरवरूनच मेसेज पाठवू शकतात. हे लोक तुमच्या मित्राचा फोटो डीपीमध्ये टाकून तुमची दिशाभूल करतात. यानंतर, तुम्ही त्याच्याशी बोलायला लागताच, त्यानंतर हॅकर तुम्हाला ओटीपी मागणारा मेसेज पाठवेल. हॅकर तुम्हाला सांगेल की त्याने तुमच्या नंबरवर चुकून मेसेज पाठवला आहे, कृपया तो फॉरवर्ड करा, पण सत्य हे आहे की हॅकरला ओटीपीद्वारे तुमचे खाते हॅक करायचे आहे.
तुम्ही OTP सांगताच तुमच्या नंबरवरून हॅकरच्या फोनमध्ये WhatsApp सुरू होते. वास्तविक, नवीन डिव्हाइसमध्ये WhatsApp इन्स्टॉल करण्यासाठी, एक OTP आवश्यक आहे, जो हॅकर तुमच्याकडून मागतो. यानंतर तुमचे WhatsApp अकाउंट हॅकरच्या ताब्यात जाते. आता हॅकर तुमच्या नंबरवरून तुमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना मेसेज पाठवून पैसे मागतो आणि ब्लॅकमेलसारखे अनेक फसवेगिरी करतो. धक्कादायक प्रकार टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ओटीपी कोणासोबतही शेअर न करणे आणि WhatsApp वर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करणे.
OTT व्यतिरिक्त, एक कोड देखील आवश्यक असेल जो फक्त तुमच्याकडे असेल. WhatsApp वर कोणालाही पैसे पाठवण्यापूर्वी किंवा महत्त्वाची माहिती शेअर करण्यापूर्वी त्याचा नंबर तपासा, नंबर आठवत नसेल तर जुने चॅट तपासा. तुम्हाला कळेल की तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात ती व्यक्ती खरोखर तुमची ओळखीची व्यक्ती आहे की फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारा आहे. कोणत्याही किंमतीत OTT शेअर करण्याची चूक करू नका. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"