नवी दिल्ली - तंत्रज्ञानाच्या या युगात हॅकर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धत शोधून काढत आहेत. आता सायबर गुन्हेगार इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) लोकांचे अकाउंट हॅक करत आहे. त्यामुळे एक छोटीशी चूक देखील महागात पडू शकते. तंत्रज्ञानाच्या या युगात हॅकर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धत शोधून काढत आहेत. आता सायबर गुन्हेगार इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर लोकांचे अकाऊंट हॅक करत आहे. त्यामुळे एक छोटीशी चूक देखील महागात पडू शकते. अकाऊंटचा अॅक्सेस मिळवण्यासाठी हे मेसेज सायबर गुन्हेगारांकडून पाठवले जातात. जेव्हा एखादी व्यक्ती आपला फोन बदलते, त्यावेळी व्हॉट्सअॅपकडून 6 अंकी कोड पाठवला जातो. यामुळे दुसऱ्या फोनमध्ये अॅक्सेस मिळतो. अशाच फसवणुकीपासून वाचण्यासाठी व्हॉट्सअॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे.
व्हॉट्सअॅपने नुकतेच फ्लॅश कॉल (Flash Call) नावाच्या नवीन फीचरवर काम सुरु केले आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअॅपवर लॉग-इन करण्याचा प्रयत्न केल्यावर युजर्सना त्यांचा फोन नंबर व्हेरिफाय करण्याची परवानगी मिळणार आहे. व्हॉट्सअॅपच्या फ्लॅश कॉल या नवीन फीचरला आपल्या फोनच्या कॉल लॉगमध्ये प्रवेश करण्यासाठी युजर्सची परवानगी आवश्यक आहे. हे नवं फीचर Appच्या अँड्रॉईड बीटा व्हर्जन 2.21.11.7 वर पाहिले आहे. अहवालात दिलेल्या स्क्रीनशॉटनुसार, फ्लॅश कॉल एक पर्यायी फीचर असणार आहे. जे युजर्स आपल्या आवडीनुसार वापरू शकतील. यामध्ये त्यांना फ्लॅश कॉलसाठी त्यांच्या कॉल लॉगवर व्हॉट्सअॅपला एक्सेस द्यायचा आहे की नाही याचा निर्णय घ्यावा लागेल.
WhatsApp वर पर्सनल डेटा हॅक अन् अकाऊंट होतंय लॉक; वेळीच व्हा सावध अन्यथा छोटीशी चूक पडेल महागात
व्हॉट्सअॅपचं फ्लॅश कॉल एक चांगलं फीचरआहे. WhatsApp ने स्वतःच सध्या सुरू असलेल्या फसवणुकीविषयी युजर्सना सतर्क केले आहे. ज्यामध्ये सायबर क्रिमिनल्स युजर्सना कंपनीचे प्रतिनिधी असल्याचा दावा करतात आणि त्यांना मेसेज पाठवतात आणि त्यांना पुन्हा ओटीपी शेअर करण्यास सांगतात. युजर्सला हा मेसेज टेक्स्टद्वारे पाठवला जातो. जर तुम्ही एखाद्याला हा मेसेज दिल्यास त्या व्यक्तीला तुमच्या व्हॉट्सअॅपचा अॅक्सेस मिळतो. यानंतर यूजर्सचे व्हॉट्सअॅप अकाऊंट लॉक होते व हॅकर्सचा वापर गुन्हेगारी गोष्टींसाठी करतात. सोशल मीडियावर एका यूजर्सने सांगितले की त्याच्या कुटुंबातील 3 व्यक्तींनी अशाप्रकारे अकाऊंटचा अॅक्सेस गमावला आहे. हॅकर्स व्हॉट्सअॅपवरून एक व्हेरिफाय कोड आणि मेसेज पाठवतात.
ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने त्या कोडची खूपच आवश्यकता असल्याचा व्हॉट्सअॅप मेसेज केला जातो. अशात तुम्ही हा कोड पाठवू नये व लिंकवर देखील क्लिक करू नये. या फ्रॉडमध्ये अडकलेल्या यूजर्सने सांगितले की, सायबर गुन्हेगार लोकांना टार्गेट करण्यासाठी कॉन्टॅक्ट लिस्टचा वापर करतात. व्हॉट्सअॅप यूजर्सला फसवणुकीच्या या नवीन पद्धतीपासून सावध राहायला हवे. कारण, याद्वारे सायबर गुन्हेगार लोकांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करत आहेत. जर व्यक्तीला वन टाइम पिन कोड मेसेज प्राप्त होत असेल, तर सावध होणे गरजेचे आहे. याच प्रकारे व्हॉट्सअॅप फ्रॉडला सुरुवात होते. कोणीही कितीही ओळखीचे असले तरीही कोड कोणाला शेअर करू नये, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा फेक मेसेजपासून सावध राहा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.