WhatsApp आपल्या व्हॉईस मेसेज फीचरला सुधारण्यासाठी Voice Notes फीचरवर काम करत आहे. त्यामुळे व्हॉईस नोट पाठवणे सोप्पे होईल. या फीचरच्या मदतीने युजर्स व्हॉईस नोट रेकॉर्ड करताना रेकॉर्डिंग पॉज देखील करता येईल. नवीन फीचर आल्यामुळे तुम्ही एकच व्हॉईस नोट पॉज करून तुमचा संपूर्ण मेसेज पूर्ण करू शकाल.
WhatsApp चे नवीन Voice Notes Feature
व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचर्सवर लक्ष ठेऊन असणाऱ्या WABetaInfo या वेबसाईटने या नवीन फिचरची माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार हे फिचर iOS आणि Android साठी WhatsApp Beta च्या आगामी अपडेटमध्ये रोल आउट करण्यात येईल. या अपडेटनंतर युजर व्हॉईस नोट रेकॉर्ड करताना रेकॉर्डिंग पॉज म्हणजे थांबवू शकतात आणि त्यात अजून रेकॉर्डिंग जोडू शकतात. याआधी पॉजचे फिचर नसल्यामुळे छोटे छोटे व्हॉइस नोट पाठवले जायचे. आता एकाच व्हॉइस नोटमधून संपूर्ण मुद्दा मांडता येईल.
वेबसाईटने एक व्हिडीओ शेयर करून हे फिचर कसे वापरता येईल हे दाखवले आहे. अजूनही हे फिचर बीटा टेस्टिंगसाठी उपलब्ध झाले नाही, त्यामुळे सर्वांसाठी हे फिचर कधी उपलब्ध हे अजूनतरी सांगता येणार नाही. काही दिवसांपूर्वी कंपनी अॅपचा ऑडियो इंटरफेस पूर्णपणे बदलणार असल्याची बातमी आली होती. त्यानुसार लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप एका ग्लोबल मेसेज प्लेयरवर देखील काम करत असल्याचे सांगण्यात आले होते. या फिचरच्या मदतीने एका व्यक्तीला रिप्लाय करताना दुसऱ्या व्यक्तीकडून आलेला व्हॉइस मेसेज ऐकता येईल.