नवी दिल्ली :भारतात डिजिटल पेमेंट सर्व्हिस प्रोव्हाईडरमध्ये (Digital Payment Service Providers) आज आणखी एक नवीन नाव जोडले आहे. जे व्हॉट्सअॅप पेमेंट्स सर्व्हिस (WhatsApp Payments service) आहे. आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय आणि एचडीएफसी या प्रमुख बँकांच्या भागीदारीने फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने भारतात डिजिटल पेमेंट सर्व्हिस सुरू केली आहे. याठिकाणी या चारही बँकांचे कोट्यावधी ग्राहक व्हॉट्सअॅपच्या मदतीने ऑनलाईन पैसे पाठवू शकतात आणि आपल्या खात्यावर मागवू शकणार आहेत.
असे सुरू करा WhatsApp Payments फीचरभारतात कोट्यावधी लोक व्हॉट्सअॅप वापरतात, ज्यावर ते कॉल, एसएमएस तसेच व्हिडिओ कॉलचा लाभ घेतात. आता ते व्हॉट्सअॅपवरुनच पैसे पाठवू किंवा मागवू शकणार, तेही घरी बसल्या फोनवरून. यासाठी त्यांना व्हॉट्सअॅपच्या होमपेजवर उजवीकडे वरच्या बाजूस दिसणार्या तीन डॉट्सवर क्लिक करावे लागेल. यानंतर, आपल्याला Payment चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर पेमेंट विंडो उघडेल, ज्यामध्ये तुम्हालाAdd new payments method वर क्लिक करावे लागेल. त्यावर क्लिक करा आणि accept केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅपने भागीदारी केलेल्या बँकांची नावे दिसतील.
अगदी सोपी प्रक्रियाजर तुम्ही एसबीआय, एचडीएफसी, अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआयचे ग्राहक असाल तर या बँकेच्या ऑप्शनवरून तुमच्या बँकेवर क्लिक करा. यानंतर, आपल्याला फोन नंबरद्वारे बँकेसोबत व्हेरिफाय करावे लागेल. यासाठी तुम्ही तोच मोबाइल नंबर द्या, जो तुम्ही बँकेला देखील दिला आहे. आता तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि असे केल्यानंतर व्हॉट्सअॅप त्याचवेळी बँक तुमचे खाते व्हेरिफाय करेल आणि त्यानंतर पेमेंट सर्व्हिस सुरू होईल.
'सुरक्षित आणि विश्वासार्ह'आम्ही भारतीय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत काम करत आहोत आणि पेमेंट पूर्णपणे सुरक्षित आणि विश्वासार्ह असायला हवी, यावर लक्ष दिले आहे. व्हॉट्सअॅप पेमेंट सर्व्हिस भारतात Unified Payments Interface चा वापर करून विकसित केली गेली आहे, ज्याद्वारे इन्स्टंट पेमेंट सर्व्हिसचा आनंद घेता येईल, असे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी भारतात व्हॉट्सअॅप पेमेंट सर्व्हिस सुरू करताना म्हटले आहे. याचबरोबर, व्हॉट्सअॅप इंडियाचे प्रमुख अभिजीत बोस यांनी म्हटले की, भारतातील चार प्रमुख बँकांमध्ये भागीदारी केल्यामुळे आम्ही खूश आहोत आणि डिजिटल पेमेंट सर्व्हिस सुलभ आणि अधिक सुरक्षित करण्याच्या दिशेने कार्य करीत आहोत.