गेल्या अनेक दिवसांपासून Whatsapp पोल फीचरची चर्चा सुरू होती, मात्र आता ते रोलआउट करण्यात आलं आहे. Whatsapp या फीचरची अनेक दिवसांपासून चाचणी करत होतं आणि आता ते लाईव्ह करण्यात आलं आहे. त्यामुळे युजर्स Whatsapp वरही पोल तयार करू शकतील. हे फीचर फेसबुक आणि ट्विटरवर चालतं तसंच काम करेल.
तुम्ही फेसबुक आणि ट्विटरवर कधी पोल तयार केला असेल तर तुम्हाला त्याबद्दल माहिती असेलच. जर तुम्ही तसे केले नसेल तर पोल फीचरद्वारे तुम्ही तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये उपस्थित असलेल्या मित्रांना काही प्रश्न विचारू शकता आणि त्यांना उत्तर देण्यासाठी काही पर्याय देऊ शकता. Whatsapp ने हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएस दोन्हीसाठी आणले आहे. तुम्ही Whatsapp चे पोल फीचर एकाच चॅट बॉक्समध्ये आणि ग्रुप चॅटमध्येही वापरू शकता.
WhatsApp पोलची सर्वात खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही एक किंवा दोन नाही तर 12 पर्याय देऊ शकता. हे फीचर खरोखरच मजेदार असणार आहे आणि युजर्स त्याचा जोरदार वापर करतील. आता WhatsApp वर पोल कसा तयार करायचा ते जाणून घेऊया.
अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये 'असा' बनवा पोल
तुम्हाला ज्या चॅट किंवा ग्रुपमध्ये पोल तयार करायचा आहे ते ओपन करा.आता अटॅच फाइल चिन्हावर जा.तिथे तुम्हाला Poll चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि तुमचा प्रश्न टाइप करा.त्यानंतर तुम्हाला उत्तरासाठी जितके पर्याय द्यायचे आहेत तितके पर्याय जोडा आणि ते पाठवा.युजर्स पर्यायांवर क्लिक करून त्यांची उत्तरे देऊ शकतील. त्याखाली, युजर्सना व्ह्यू व्होट्सचा पर्याय मिळेल, ज्यावर क्लिक करून तुम्ही कोणत्या पर्यायावर कोणाला वोट केले ते पाहू शकता.
आयफोनवर 'असा' बनवा पोल
iOS डिव्हाइसमध्ये WhatsApp मेसेंजर एप ओपन करा.आता चॅट किंवा ग्रुपवर जा, जिथे तुम्हाला पोल तयार करायचा आहे.आता टायपिंग बॉक्सच्या उजव्या बाजूला असलेल्या + आयकॉनवर क्लिक करा.पोलचा पर्याय निवडा.आता तुम्ही तुमचा प्रश्न आणि त्याचे उत्तर पर्याय दाखवा.आता Send बटणावर क्लिक करा.एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"