इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp ने बहुप्रतीक्षित फिचरची घोषणा केली आहे. हे फिचर म्हणजे आयओएस डिवाइसवरून अँड्रॉइडवर चॅट हिस्टरी ट्रान्स्फर करणे. आता आयओएस युजर अगदी सहज आपल्या वॉयस नोट्स, फोटो आणि चॅट हिस्टरी अँड्रॉइडवर ट्रान्सफर करू शकतील. काल झालेल्या सॅमसंग अनपॅक्ड इव्हेंटमध्ये या फिचरचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. WhatsApp ने या इव्हेंटमध्ये घोषणा केली कि आयफोन युजर्स आता सॅमसंग फोन्सवर आपले चॅट्स ट्रान्सफर करू शकतील.
सर्वप्रथम हे फिचर नवीन झेड फोल्ड 3 आणि झेड फ्लिप 3 स्मार्टफोनसाठी उपलब्ध होईल. येत्या काही आठवड्यात हे फिचर इतर सॅमसंग फोनमध्ये उपलब्ध होईल. हे फिचर इतर अँड्रॉइड स्मार्टफोन कधी वापरू शकतील याची माहिती कंपनीने दिलेली नाही.
हे फीचर येण्याआधी iPhone वरून Android फोनवर स्विच करताना चॅट ट्रान्सफर करण्यासाठी थर्ड पार्टी अॅपची मदत घ्यावी लागत होती. परंतु आता या फिचरमुळे हे काम खूप सोप्पे होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चॅट हिस्ट्री फीचर अँड्रॉइड 10 किंवा त्यानंतरचे ओएस असणाऱ्या सॅमसंग फोनवर उपलब्ध होईल. या फिचरच्या मदतीने चॅटसह इमेज आणि वॉयस मेमो देखील ट्रान्सफर होतील.
WhatsApp वर आले View Once फिचर
View Once फिचर मिळाल्यावर युजर्सना फोटो किंवा व्हिडीओ पाठवताना मेसेज प्रीव्यू सोबत छोटा View Once (व्यू वन्स) बटण दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर हे फिचर अॅक्टिव्हेट होईल आणि पाठवलेला फोटो किंवा व्हिडीओ फक्त रिसिव्हरला फक्त एकदाच बघता येईल. मेसेज पाठवणाऱ्या युजरला मेसेज डिलिवर, सीन आणि ओपन्ड असे मेसेजचे स्टेटस दिसतील. म्हणजे रिसिव्हरने हा मेसेज उघडून बघितला कि नाही हे देखील समजेल.