WhatsApp युजर्ससाठी एक खूशखबर आहे. लवकरच तुम्ही इंटरनेटशिवायही WhatsApp वापरू शकता. एवढच नाही तर तुमच्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली असली तरीही तुम्ही WhatsApp वापरू शकता. WhatsAppलवकरच हे फीचर जारी करणार आहे. कंपनीने स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. याशिवाय डेस्कटॉपवर WhatsAppवापरणारे युजर्स आता ऑडिओ कॉल आणि ग्रुप व्हिडीओ कॉलही करू शकतात.
WhatsApp ने ट्विट करून युजर्सला नवीन अपडेट्सची माहिती दिली आहे. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'चार्जर नाही, काळजी करू नका. आता तुम्ही चार डिव्हाईसमध्ये WhatsApp लिंक करू शकता. तुमचा फोन ऑफलाइन असला तरीही, तुमच्या गप्पा एन्क्रिप्ट केल्या जातील, सिंक्ड केल्या जातील आणि सुरू राहतील. डिव्हाइसेसना लिंक करणे सोपे करण्यासाठी आम्ही Windows साठी एक नवीन App तयार केले आहे. हे App लवकर लोड होईल. चॅटिंगमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.
WhatsAppने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, 'आम्ही विंडोज डेस्कटॉपसाठी नवीन आणि वेगवान WhatsApp आणले आहे. यामध्ये ग्रुप व्हिडीओ कॉल आणि ऑडिओ कॉल करू शकतात. WhatsAppच्या ब्लॉगपोस्टनुसार, तुम्ही आठ लोकांपर्यंत व्हिडीओ कॉल करू शकता आणि 32 लोकांपर्यंत ग्रुप ऑडीओ कॉल करू शकता. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही मर्यादा आगामी काळात वाढवली जाऊ शकते.
डेस्कटॉप Appचा इंटरफेस मोबाईल व्हर्जनसारखाच असेल. WhatsApp ने यापूर्वी WhatsAppग्रुपचा आकार वाढवला होता. आता 1,024 सदस्य ग्रुपमध्ये सामील होऊ शकतात. त्याचबरोबर ग्रुपमध्ये कोण सहभागी होणार याचे नियंत्रण ग्रुप एडमिनच्या हातात असेल. ग्रुपमधील कोणताही मेसेज डिलीट करण्यासाठी एडमिनकडे दोन दिवस असतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"