मुंबई- व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅप्लिकेशनवर ब्लू टिक फीचर आहे. या ब्लू टिकमुळे तुमचा मेसेज तुम्ही ज्या व्यक्तीला मेसेज केला त्याने वाचला ते समजतं. तसंच तुम्हाला आलेला मेसेज वाचला गेला की नाही हेही समजतं. या ब्लूक टिकला रीड रिसीप्ट असं म्हणतात. काही व्हॉट्सअॅप युजर्स प्रायव्हसीचा विचार करून रीड रिसीप्ट बंद ठेवतात. मेसेज वाचला आहे की नाही, हे समोरच्याला समजू नये यासाठी रीड रिसीप्ट बंद केलं जातं. पण व्हॉट्सअॅपवर एक अशी पद्धत आहे ज्यामुळे रीड रिसीप्ट बंद असतानाही समोरच्या व्यक्तीने तुमचा मेसेज वाचला आहे की नाही ? ते तुम्हाला समजेल. व्हॉइस मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला मेसेजेस वाचले गेले असल्याची माहिती करून घेता येईल. व्हॉट्सअॅपने 2014मध्ये रीड रिसीप्ट फीचर लॉन्च केलं. यामुळे मेसेज वाचले गेल्याची माहिती मेसेज पाठविणाऱ्या मिळू लागली. रीड रिसीप्ट बंद असेल तर व्हिडीओ व मेसेज वाचले व पाहिले गेले आहेत की नाही? हे समजत नाही. पण हे फीचर व्हॉइस मेसेजच्या बाबतीत लागू होत नाही.
त्यामुळे तुम्ही तुमच्या फ्रेण्डलिस्टमधील रीड रिसीप्ट बंद असणाऱ्या व्यक्तीला मेसेज पाठविल्यावर त्याने तो मेसेज वाचल्याचं समजून घेण्यासाठी व्हॉइस क्लिपचा पर्याय वापरू शकता. मेसेज पाठविलेल्या व्यक्तीने व्हॉइस क्लिप पाहिल्यावर दोन ब्लू टिक येतात यामुळे तुमचे मेसेज वाचले गेल्याचं व ती व्यक्ती ऑनलाईन असल्याचं सहजपणे समजेल.
याशिवाय व्हॉट्सअॅपने डिलीट फॉर एव्हरीवन फीचरला अपडेट केलं आहे. या अपडेटमध्ये युजरला पाठविलेला मेसेज 4096 सेकंदात म्हणजेत 68 मिनिटं आणि 16 सेकंदात डिलीट करता येणार आहे. याआधीच्या अपडेटमध्ये पाठविलेला मेसेज 7 मिनिटात डिलीट करण्याची सुविधा देण्यात आली होती.