मुंबई: जगभरात कोट्यवधी वापरकर्ते असलेल्या व्हॉट्स अॅपमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. व्हॉट्स अॅपमध्ये बग आल्यानं वापरकर्त्यांना लास्ट सीन, ऑनलाईन दिसत नाहीए. लास्ट सीन, ऑनलाईन दोन्ही फिचर प्रायव्हसी सेटिंगचे भाग आहेत. मात्र व्हॉट्स अॅपमध्ये आलेल्या बगमुळे सेंटिग्सच बदलता येत नाही. ज्यांनी आधीपासून लास्ट सीनचा पर्याय 'ऑन' ठेवला होता, त्यांनाही लास्ट सीन दिसत नाहीए.व्हॉट्स अॅपवरील लास्ट सीन बंद झाल्यानं अनेकांनी सेटिंग्समध्ये जाऊन त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक अडचणीमुळे सेटिंग्स बदलता येत नसल्याचा अनुभव अनेकांना आला. 'फेल्ड टू अपटेड प्रायव्हसी सेटिंग्स. प्लीज ट्राय अगेन लेटर' असा मेसेज सेंटिग्स बदलताना येत आहे. ही समस्या नेमकी कधीपासून निर्माण झाली आणि ती कधीपर्यंत सोडवली जाईल, याबद्दल अद्याप तरी व्हॉट्स अॅपनं कोणतीही माहिती दिलेली नाही.
व्हॉट्स अॅपचा 'टेक्निकल लोच्या'; ऑनलाईन, लास्ट सीन दिसेना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 01:25 IST
प्रायव्हसी सेटिंग्समधील लास्ट सीन, ऑनलाईन फिचरवर परिणाम; व्हॉट्स अॅपमध्ये बग आल्यानं समस्या
व्हॉट्स अॅपचा 'टेक्निकल लोच्या'; ऑनलाईन, लास्ट सीन दिसेना!
ठळक मुद्देव्हॉट्स अॅपमध्ये तांत्रिक अडचण आल्यानं लास्ट सीन, ऑनलाईन स्टेटस दिसत नाहीव्हॉट्स अॅपमध्ये बग आल्यानं प्रायव्हसी सेटिंग्स बदलण्यात अडचणभारतासह, अमेरिका, ब्रिटनमधील व्हॉट्स अॅप वापरकर्त्यांना जाणवतेय समस्या