भारतात बंद होणार Whatsapp?; IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टच सांगितलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 05:11 PM2024-07-29T17:11:57+5:302024-07-29T17:12:57+5:30

अश्विनी वैष्णव काँग्रेस नेते विवेक तन्खा यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नावर बोलत होते...

WhatsApp to shut down in India IT Minister Ashwini Vaishnav said clearly | भारतात बंद होणार Whatsapp?; IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टच सांगितलं?

भारतात बंद होणार Whatsapp?; IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टच सांगितलं?

माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. मेटाने भारतातील व्हॉट्सॲप सेवा बंद करण्यासंदर्भात सरकारला कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही, असे वैष्णव यांनी म्हटले आहे. ते काँग्रेस नेते विवेक तन्खा यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नावर बोलत होते.

यूजर्सचा तपशील सामायिक करण्यासंदर्भात सरकारची सूचनां मान्य न केल्यामुळे WhatsApp भारतात आपली सेवा बंद करण्याचा विचार करत आहे का? असा प्रश्न काँग्रेस नेते विवेक तन्खा यांनी केला होता.

तत्पूर्वी, या वर्षाच्या सुरुवातीला व्हॉट्सॲपने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले होते की, जर कंपनीला मेसेजचे एन्क्रिप्शन तोडण्यास भाग पाडले गेले, तर आपण भारतात काम करणे बंद करू. मेटाने थेट भारतातील नव्या आयटी नियमांना आव्हान दिले होते. तसेच, हे निय गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचेही मेटाने म्हटले होते.

काय म्हणाले अश्विनी वैष्णव? -
आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी संबंधित सरकारचे निर्देश राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्था सुनिक्ष्चित करण्यासाठी जारी करण्यात आले आहेत. हे नियम भारताचे सार्वभौमत्व आणि सुरक्षितता आणि इतर देशांसोबत मैत्री कायम ठेवण्यासाठी करण्यात आले आहेत. याशिवाय, सार्वजनिक सुव्यवस्थेशिवाय गुन्हेगारीला उत्तेजन देणारी कोणतीही कृती रोखण्यासाठी आहेत.

Web Title: WhatsApp to shut down in India IT Minister Ashwini Vaishnav said clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.