जर तुम्ही WhatsApp च्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ पाठवत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. WhatsApp ने 3 नवीन फीचर्स लॉन्च केले आहेत. त्यामुळे WhatsApp वरून फोटो आणि व्हिडीओ शेअर करणं सोपं होणार आहे. WhatsApp चे नवीन फीचर अँड्रॉईड युजर्ससाठी आणण्यात आले आहे. WhatsApp च्या तिन्ही फिचर्समुळे अनेक गोष्टी सोप्या होणार आहेत.
डॉक्यूमेंट कॅप्शन फीचर
WhatsApp च्या नवीन फिचर्सबद्दल बोलायचे तर WhatsApp ने डॉक्युमेंट कॅप्शन फीचर आणले आहे. यासोबतच एक मोठा ग्रुप सब्जेक्ट आणि डिस्क्रिप्शन फीचर देण्यात आले आहे. म्हणजे, एखादे डॉक्युमेंट शेअर करण्यापूर्वी, तुम्ही त्याच्याशी संबंधित माहिती देऊ शकाल.
मीडिया फाईल शेअरिंग ऑप्शन
WhatsApp ने मीडिया फाईल शेअरिंगचा पर्याय दिला आहे, ज्याच्या मदतीने युजर्स एकाच वेळी 100 मीडिया फाइल्स शेअर करू शकतात. याच्या मदतीने WhatsApp च्या माध्यमातून मोठ्या फाइल्स सहज शेअर करता येतात. यापूर्वी एकाच वेळी 30 मीडिया फाइल्स पाठवता येत होत्या. तसेच अवतार फीचर आणण्यात आले आहे.
अवतार फीचर
WhatsApp ने अवतार फीचर आणलं आहे. म्हणजे तुम्ही WhatsApp वर अवतार आणि कॅरेक्टर स्टाईलसह उत्तर देऊ शकाल. यासोबत प्रोफाईल फोटोमध्ये तुम्ही अवतार किंवा स्टिकर्स लावू शकाल. यासह, युजर्ससाठी चॅटिंग मजेदार होणार आहे.
डाउनलोडसाठी उपलब्ध आहे फीचर
हे फीचर युजर्सना डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. WhatsApp चं लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. WhatsApp गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"