नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअॅपही आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. ग्रुपमध्ये सातत्याने अनेक मेसेज येत असतात. तसेच आपल्या मित्रमैत्रिणांकडून मेसेज येत असतात. पण नवीन मेसेज आल्यावर जुने मेसेज मागे जातात. त्यातील महत्त्वाचे अथवा खास मेसेज हवे असल्यास स्क्रिनशॉट्स काढले जातात. मात्र आता असं करण्याची गरज नाही कारण व्हॉट्सअॅपमध्ये एक असं फीचर आहे ज्याच्या मदतीने युजर्स महत्त्वाच्या मेसेजला बुकमार्क देऊ शकतात.
व्हॉट्सअॅपवर प्रायव्हेट आणि ग्रुप चॅट अशा दोन्ही ठिकाणी ही फीचर उपलब्ध आहे. याच्या मदतीने युजर्स कोणताही मेसेज सहजपणे दोन वेळा अॅक्सेस करू शकतात. स्टार मेसेज या नावाने व्हॉट्सअॅपवरच हे फीचर ओळखलं जातं. विंडो (Windows), अॅन्ड्रॉईड (Android) आणि आयओएस (iOS) तीनही प्लॅटफॉर्मवर हे फीचर उपलब्ध आहे.
'या' स्टेप्स वापरून हवा असलेला मेसेज करा स्टार
- सर्वप्रथम स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप ओपन करा.
- तुम्हाला हवा असलेला मेसेज ज्या ग्रुप चॅट किंवा प्रायव्हेट चॅट आहे तिथे जा.
- चॅटमध्ये जो मेसेज हवा आहे म्हणजेच खास असलेला मेसेज काही वेळ होल्ड करा. होल्ड केल्यानंतर चॅटवर काही पर्याय दिसतील.
- चॅट बॉक्समध्ये वरच्या दिशेला स्टारचा एक आयकॉन दिसेल त्यावर टॅप करा.
- स्टार केल्यानंतर तो खास मेसेज सेव्ह होईल .
व्हॉट्सअॅपवरील एखादा जुना मेसेज शोधायचा असल्यास सर्च पर्यायावर क्लिक करून शोधा. यासाठी सर्च बॉक्समध्ये त्या मेसेजशी संबंधित माहिती देणे गरजेचे आहे.
WhatsApp स्टेटसला फेसबुक स्टोरी बनवायचंय? मग 'या' स्टेप्स करतील मदत
WhatsApp वर असं अॅक्टिव्ह करा डार्क मोड फीचर गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपच्या डार्क मोड फीचरची जोरदार चर्चा सुरू आहे. कंपनी Android Developers आणि Apple iOS Developers वर Dark Mode फीचरवर काम करत आहे. व्हॉट्सअॅप युजर्स खूप दिवसांपासून या फीचरची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी डार्क मोड फीचरचे काही फोटो हे लीक झाले होते. मात्र हे फीचर युजर्सना कधी उपलब्ध होणार याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. गुगल क्रोम (Google Chrome) आणि इतर काही गुगल अॅप्स (Google Apps) सोबत फेसबुक मेसेंजरने देखील आपल्या प्लॅटफॉर्मवर डार्क मोड फीचरचा समावेश केला आहे. Android फोनचा वापर करत असाल तर आधी तुमचा फोन Android Q च्या बीटा व्हर्जनवर काम करत आहे का हे तपासून घ्या. अनेक Andorid Mobile फोन Android Q च्या लेटेस्ट बीटा व्हर्जनचा वापर करू शकतात. या लिस्टमध्ये गुगल पिक्सलच्या काही स्मार्टफोनचा समावेश आहे.
WhatsApp चॅटींगची गंमत वाढणार, लवकरच 'हे' धमाकेदार फीचर्स येणार
WhatsApp वर आवडत्या व्यक्तीने ब्लॉक केलंय? असं तपासा
व्हॉट्सअॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र व्हॉट्सअॅपवर काही कारणास्तव आपण आपल्याला नको असलेल्या व्यक्तींना ब्लॉक करू शकतो. त्या व्यक्तींना ब्लॉक केल्यावर मेसेज पाठवला अथवा रिसीव्ह केला जात नाही. तसेच चॅट म्हणजेच संवाद साधता येत नाही. एखाद्या व्यक्तीशी वाद झाला की लगेचच व्हॉट्सअॅपवर त्या व्यक्तीला ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला जातो. जोपर्यंत आपण अनब्लॉक करत नाही तोपर्यंत फोटो, व्हिडीओ, मेसेज पाठवता येत नाही. कधी कधी आपण एखादया व्यक्तीला मेसेज करतो पण तो मेसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहचला आहे की नाही हे समजतच नाही. म्हणजेच त्या व्यक्तीने ब्लॉक केल्याची दाट शक्यता असते. आपल्याला कोणी ब्लॉक केलं आहे का? किंवा आवडत्या व्यक्तीने ब्लॉक केलंय का? हे तपासण्यासाठी काही ट्रिक्स आहेत.