शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

WhatsApp स्टेटसमुळे त्रस्त असाल तर 'ही' ट्रिक करेल मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 3:21 PM

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक जण आपली स्टोरी ही स्टेटसवर शेअर करत असतात. मात्र काही वेळेस त्याचा कंटाळा येतो. मात्र या स्टेटसपासून युजर्सना त्यांची सुटका करता येते. 

ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. कधी कधी व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप अनेक असल्याने त्यावर येणाऱ्या असंख्य मेसेजचा कंटाळा देखील येतो. ट्सअ‍ॅपवर अनेक जण आपली स्टोरी ही स्टेटसवर शेअर करतात. या स्टेटसपासून युजर्सना सुटका करता येते. 

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. त्यामुळेच व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे. एखादा फोटो, व्हिडीओ किंवा अन्य काही महत्त्वाचे डॉक्यूमेंट्स पाठवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो. मात्र कधी कधी व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप अनेक असल्याने त्यावर येणाऱ्या असंख्य मेसेजचा कंटाळा देखील येतो. व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक जण आपली स्टोरी ही स्टेटसवर शेअर करत असतात. मात्र काही वेळेस त्याचा कंटाळा येतो. मात्र या स्टेटसपासून युजर्सना त्यांची सुटका करता येते. 

व्हॉट्सअ‍ॅपवर कॉन्टॅक्ट लिस्टमधील अनेकांचे स्टेटस दिसत असते. जर युजर्सना ते स्टेटस कायमचं डिलीट करायचं असेल तर सर्वप्रथम फोनचं इंटरनेट बंद करा. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप बंद करून स्मार्टफोनच्या सेटींगमध्ये जा. तिथे व्हॉट्सअ‍ॅपला फोर्स स्टॉप करा. यानंतर ही काही वेळ ऑफलाईन राहा म्हणजेच फोनचं इंटरनेट बंद ठेवा. त्यानंतर फोनच्या टाईम सेटींगमध्ये जाऊन तेथे असलेल्या वेळेपेक्षा 24 तास पुढे असलेली वेळ देऊन वेळ बदला. फोनची वेळ बदलल्यानंतर टाईम सेटींग बंद करा. त्यानंतर बंद केलेले फोनचे इंटरनेट सुरू करा. तसेच व्हॉट्सअ‍ॅप सुरू करा. त्यानंतर कोणाचेही स्टेटस दिसणार नाही. 

IPL सीझनसाठी Whatsapp चा स्पेशल क्रिकेट स्टीकर पॅक, असा करा डाऊनलोड गेल्या वर्षी व्हॉट्सअ‍ॅपने अ‍ॅन्डॉईड आणि आयओएस अ‍ॅपवर स्टीकर फीचर आणलं होतं. त्यामध्ये नवनवीन पॅक येत असतात. आता व्हॉट्सअ‍ॅपने स्पेशल क्रिकेट स्टीकर पॅक आणला आहे. क्रिकेट प्रेमी लगेचच हा पॅक डाऊनलोड करू शकतात. सध्या हा स्टीकर पॅक व्हॉट्सअ‍ॅपमध्ये दिसत नाही तर तो अ‍ॅड करावा लागतो. स्पेशल क्रिकेट स्टीकर पॅक एकदा डाऊनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने इमोजीप्रमाणे त्याचा वापर करता येतो. स्टीकर्सचा वापर हा मोठ्या प्रमाणात युजर्सकडून केला जातो. 

WhatsApp युजर्ससाठी Bad News; आता 'हे' खास फीचर मिळणार नाही

WhatsApp चं नवं अपडेट, 'या' फीचरच्या जागेत झाला बदल

इन्संट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp हे आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. WhatsApp ने पुन्हा एकदा आपल्या युजर्ससाठी एक खास बदल केला आहे. WABetaInfo ने याबाबतची माहिती दिली आहे. WhatsApp ने अपडेट केल्यानंतर एका फीचरच्या जागेत बदल केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जन 2.19.101 अपडेटमध्ये 'अर्काइव्ड चॅट्स' या फीचरला मेन साइड मेन्यूमध्ये जागा देण्यात आली आहे. सध्या हा पर्याय चॅटमध्ये सर्वात खाली दिसत आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्य़ा अपडेटनंतर Archived Chats मेन मेन्यूमध्ये दिसणार आहे. 

WhatsApp वरचे जुने Emojis गायब होणार; 'हे' आहे कारण  

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप आपल्या नव्या डूडल फीचरमध्ये काही विशेष बदल करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप अपडेट झाल्यानंतर डूडल फीचरमधील जुने Emojis गायब होणार असून, त्याजागी ऑफिशियल Emojis येणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर इमोजीच्या माध्यमातून चॅटींगची गंमत आणखी वाढत असते. तसेच मेसेज टाईप करण्यापेक्षा इमोजीच्या माध्यमातून संवाद साधणं अनेकांना जास्त सोयीचं वाचत असतं. सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या डूडलमध्ये अनेक कस्टमाइज स्टीकर्स आहेत, जे मीडिया फाइल पाठवताना एडिट ऑप्शन सिलेक्ट करून फोटोवर लावता येतात. व्हॉट्सअ‍ॅप मधले हे अपडेट्स पाहायचे असतील तर फिचर Enable करावं लागेल त्याशिवाय ते Doodle UI मध्ये दिसणार नाहीत असं WABetaInfoने म्हटलं आहे. हा बदल घडवून आणण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ने बीटा व्हर्जन 2.19.106 मधले जुने Emojis काढून त्याठिकाणी नवे Emojis टाकले आहेत.

WhatsApp वर क्वालिटी खराब न करता 'असे' पाठवा फोटो

चॅटींगची गंमत वाढणार; आता लँडलाईन नंबरवरही WhatsApp चालणार

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. पण तुम्हाला माहित आहे का? WhatsApp आता लँडलाईन नंबरवरही चालणार आहे. युजर्स आपल्या लँडलाईन नंबरसोबत आपल्याला हवं असल्यास व्हॉट्सअ‍ॅप कनेक्ट करू शकतात यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कोणासोबत शेअर करण्याचीही गरज लागणार नाही व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरचा फायदा हा WhatsApp Business App युजर्सना अधिक होणार आहे. या फीचरच्या मदतीने व्यावसायिक आपल्या लँडलाईन नंबरवरून आरामात व्हॉट्सअ‍ॅप  ऑपरेट करू शकतात. तसेच या फीचरचं वैशिष्ट्य म्हणजे युजर्सचा पर्सनल मोबाईल नंबर तुम्हाला नको असलेल्या लोकांसोबत शेअर करता येत नाही. 

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान