नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. यामुळे चॅटिंगमधली गंमत वाढून ते आणखी मजेशीर होतं. अशीच आणखी काही भन्नाट फीचर्स व्हॉट्सअॅपने आणली आहे. व्हॉट्सअॅपने कॅटलॉग शॉर्टकट, व्हॉट्सअॅप डूडल आणि न्यू कॉल बटण अशी तीन जबरदस्त फीचर्स आणली आहेत. WABetaInfo ने दिलेल्या एका रिपोर्टनुसार,अँड्रॉईड बीटाच्या लेटेस्ट कोडवर हे फीचर्स दिसले आहेत.
व्हॉट्सअॅप संबंधित बातमी आणि अपडेटला ट्रॅक करणारी वेबसाईट WABetaInfo ने या नवीन फीचर्ससाठी व्हॉट्सअॅपला बीटा व्हर्जन 2.20.200.3 ची गरज असल्याचं सांगितलं आहे. रिपोर्ट्सनुसार, सध्या नवीन कॉल बटणाची टेस्टिंग केली जात आहे. नवीन कॉल बटणला कंपनी सुरूवातीला बिजनेस चॅट्ससाठी ऑफर करणार आहे. नवीन कॉल बटण हे व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलसाठी शॉर्टकट म्हणून देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलच्या शॉर्टकटचा ऑप्शन मिळणार
नव्या बटणावर टॅप केल्यानंतर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलच्या शॉर्टकटचा ऑप्शन मिळणार आहे. युजर्स त्याला हवा असलेला ऑप्शन निवडू शकतात. तसेच कंपनी बिझनेस चॅटसाठी क्विक शॉर्टकट घेऊन येण्याची तयारी करत आहे. हे फीचर आता विकसित केले जात आहे. याला इनेबल केल्यानंतर कॉल बटणच्या बाजूला एक शॉर्टकट अॅड होणार आहे. मात्र याबाबत अद्याप जास्त माहिती मिळालेली नाही.
व्हॉट्सअॅप सॉलिड वॉ़लपेपरमध्ये डूडल
व्हॉट्सअॅप आपले वॉलपेपर फीचरला आणखी चांगले बनवण्यासाठी काम करीत आहे. यात एक व्हॉट्सअॅप सॉलिड वॉ़लपेपरमध्ये डूडल अॅड करण्याची सुविधा आहे. व्हॉट्सअॅप बीटा 2.20.200.3 मध्ये या फीचरला WhatsApp Doodles नावाने स्लॉट केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर हा केला जातो. व्हॉट्सअॅप चॅटिंग सुरक्षित राहावं, आपल्या व्यतिरिक्त ते इतर कोणी वाचू नये असे अनेकांना वाटत असतं. यासाठी व्हॉट्सअॅपने देखील आपल्या युजर्सना कमाल सुविधा दिली आहे. काही जबरदस्त सेटिंग्सच्या मदतीने हे करणं सहज शक्य आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मस्तच! आता Google सांगणार तुम्हाला कोण करतंय कॉल?, TrueCaller ला टक्कर
जबरदस्त! WhatsApp ची कमाल सेटिंग, कोणीच वाचू शकणार नाही तुमचं चॅटिंग
"अरविंद केजरीवाल जिवंत आहेत तोपर्यंत असं होणार नाही", आपचा भाजपावर हल्लाबोल
CoronaVirus News : "कोरोना व्हायरस नष्ट झाला", भाजपा नेत्याचा अजब दावा