WhatsApp आपल्या प्लॅटफॉर्मवर सतत नवनवीन फीचर्स जोडत आहे. कंपनीने Android युजर्ससाठी UI रिडिझाइन केलं आहे. अलीकडेच WhatsApp वर नवीन सर्च बार आणि मेटा एआय फीचरही आले आहे. Meta AI चे फीचर अद्याप सर्व युजर्ससाठी उपलब्ध नाही.
आता WhatsApp ने आपल्या प्लॅटफॉर्मवर आणखी एक नवीन फीचर जोडलं आहे. हे फीचर चॅट फिल्टरचं आहे. Meta च्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने या फीचरची माहिती देणारी एक ब्लॉग पोस्ट जारी केली आहे. त्याबाबत जाणून घेऊया...
WhatsApp चॅट फिल्टर म्हणजे काय?
मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी चॅट फिल्टर फीचर लाँच झाल्याची माहिती दिली आहे. या फीचरनंतर तुम्ही सर्व मेसेज सहज फिल्टर करू शकाल. या फीचरमुळे चॅट ओपन करण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. कंपनी तुम्हाला वेगवेगळे चॅट्स फिल्टर करण्याचा पर्याय देत आहे.
हे फीचर जारी करण्यामागचे कारण म्हणजे लोकांना वेगवेगळ्या WhatsApp चॅट्सचा एक्सेस सोपा व्हावा. आतापर्यंत, तुम्हाला कोणत्याही WhatsApp ग्रुपमधील चॅट्स स्क्रोल करून अनरीड मेसेजसाठी इनबॉक्समध्ये जावे लागत होते. आता तुम्हाला यासाठी फिल्टर्स मिळतील, ज्यामुळे तुम्ही एकाच ठिकाणी ग्रुप चॅट पाहू शकाल.
कसं काम करतं हे फीचर?
WhatsApp ने तीन डिफॉल्ट फिल्टर्स सादर केले आहेत, ज्यामुळे तुम्ही योग्य कन्व्हर्सेशन एक्सेस करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला iOS किंवा Android स्मार्टफोनवर WhatsApp ओपन करावं लागेल. तुमचं WhatsApp अपडेट केलं आहे याची खात्री करा. आता तुम्हाला सर्वात वर दिलेल्या तीन फिल्टरवर क्लिक करावं लागेल.
सर्वात वर तुम्हाला All, Unread आणि Groups चा पर्याय मिळेल. तुम्हाला सर्व चॅट्स ऑल फिल्टरमध्ये दिसतील. ग्रुप फिल्टर वापरून, तुम्हाला सर्व ग्रुप दिसतील. त्याचप्रमाणे तुम्ही अनरीड चॅटचे फिल्टर सिलेक्ट केल्यास तुम्ही न वाचलेले सर्व चॅट्स दिसतील.