WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. भारतातच त्याच्या एक्टिव्ह युजर्सची संख्या 40 कोटींच्या पुढे आहे. या App ची मालकी मेटाकडे आहे. युजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी कंपनी नवनवीन फीचर्स जोडत राहते. WhatsApp ने iOS युजर्ससाठी नवीन फीचर जारी केले आहे. कंपनीने App ची नवीन आवृत्ती जारी केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक अतिशय मनोरंजक फीचर मिळणार आहे.
नव्या फीचरच्या मदतीने, iOS युजर्स फोटोवर लिहिलेला मजकूर कॉपी करू शकतात. जरी हे फीचर आयओएसमध्ये यापूर्वी देखील उपलब्ध होते, परंतु WhatsApp ने ते आपल्या प्लॅटफॉर्मवर आता जोडले आहे. याच्या मदतीने युजर्स WhatsApp वरूनच टेक्स्ट कॉपी करू शकतात. नवीन अपडेट बीटा व्हर्जनचा भाग नाही. त्याऐवजी, कंपनीने ते स्टेबल युजर्ससाठी जारी केले आहे. या फीचरचा तपशील WABetaInfo ने शेअर केला आहे.
जर तुम्ही iOS युजर्स असाल आणि हे फीचर उपलब्ध नसेल, तर तुम्हाला App Store वर जाऊन WhatsApp अपडेट करावे लागेल. यानंतर तुम्हाला नवीन फीचर दिसेल. इतर अनेक नवीन फीचर्स WhatsApp वर येणार आहेत. असेच एक फीचर म्हणजे ऑडिओ स्टेटस. या फीचरच्या मदतीने तुम्ही WhatsApp स्टेटसवर व्हॉइस नोट्स शेअर करू शकाल. कंपनीने अलीकडेच आपल्या प्लॅटफॉर्मवर हे फीचर जोडले आहे.
तुम्ही यासाठी प्रायव्हेट ऑडियन्स देखील निवडू शकता, जेणेकरुन ते फक्त तुम्हाला हवे असलेल्या लोकांनाच दिसेल. WhatsApp च्या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही 30 सेकंदांचा ऑडिओ स्टेटस सेट करू शकाल. यासोबतच App ने स्टेटस रिएक्शनचे फीचरही जोडले आहे. या फीचरच्या मदतीने युजर तुमच्या स्टेटसवर प्रतिक्रिया देऊ शकतो. युजर्सचे स्टेटस आता त्यांच्या प्रोफाईलवर रिंगच्या रुपात देखील दिसत आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"