नवी दिल्ली-
इन्स्टंट मेसेजिंग अॅप्लिकेशन व्हॉट्सअॅपवर अनेक फिचर्स मिळतात. यात मेसेजिंग, कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग आणि मीडिया फाइल सेंड करण्याचंही फिचर मिळतं. यासोबतच दर दिवशी कोणतं तरी नवं फिचर व्हॉट्सअॅप आपल्या युझर्सना देण्याचा प्रयत्न करत असतं. डेवलपर्सनं आता व्हॉट्सअॅपवर एक असं फीचर आणलं आहे की ज्याची आतुरतेनं लोक वाट पाहात होते. खरंतर विविध ट्रिक्सचा वापर करुन युझर्स या फिचरचा वापर करत होतेच. पण आता व्हॉट्सअॅपनंही हे फिचर हायलाइट केलं आहे. व्हॉट्सअॅप आता मेसेज युवरसेल्फ (Message Yourself) हे फिचर आणणार आहे.
बिटा युझर्सना मिळतंय Message Yourself फिचरमेसेज युवरसेल्फ फिचरच्या मदतीनं यूझर्स स्वत:ला व्हॉट्सअॅपवर मेसेज करु शकणार आहेत. हे फिचर अनेक गोष्टींमध्ये युझरच्या कामी येणार आहे. सध्या हे फिचर बिटा व्हर्जनमध्ये असून ते अँड्रॉइड बिटा व्हर्जन २.२२.२३.२ वर दिसून आलं आहे. हे फिचर सध्या काही बिटा टेस्टर्सच्या वापरासाठी दिलं गेलं आहे. महत्वाची बाब म्हणजे व्हॉट्सअॅपवर तुम्ही स्वत:ला मेसेज करण्याची सुविधा याआधी देखील होती. आता तिच सुविधा पुन्हा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पण यात एक अपडेट देण्यात येणार आहे.
आता तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर व्हॉट्सअॅपवर दिसेल. पण WhatsApp आता तुमचं पर्सनल चॅट देखील हायलाइट करणार आहे. WABetaInfo नं याचा एक स्क्रिनशॉट देखील शेअर केला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये मेसेज युवरसेल्फला हायलाइट केल्याचं दिसून येतं. सर्व युझर्ससाठी हे फिचर केव्हा लाइव्ह होणार याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. WhatsApp वर आणखी काही फिचर्स लवकरच येणार आहेत. त्यांचंही बिटा व्हर्जन समोर आलं आहे.