जे लोक सतत लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर काम करतात ते देखील व्हॉट्सअॅपचा वापर करतात. सध्या वेब व्हॉट्सअॅपचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच विंडोजसाठी उपलब्ध असलेल्या अॅपमध्ये देखील तीच टेक्नॉलॉजी वापरली जाते. परंतु आता डेस्कटॉप युजर्ससाठी व्हॉट्सअॅपचा अनुभव बदलणार आहे. या अॅपचे नवीन व्हर्जन विंडोज युजर्ससाठी आले आहे. सध्या बीटा व्हर्जनमध्ये मायक्रोसॉफ्ट स्टोरवर डाउनलोडसाठी उपलब्ध आहे.
युजर्स हे बीटा व्हर्जन डेस्कटॉपवर इन्स्टॉल करून वापरू शकतात. यातील नवीन फीचर्सची माहिती घेऊ शकतात. एकीकडे विंडोज युजर्सना नवीन व्हॉट्सअॅप अॅप मिळत आहे. मात्र macOS युजर्ससाठी नवीन व्हर्जनची माहिती मात्र अजूनही मिळाली नाही.
व्हॉट्सअॅपने पूर्णपणे नवीन यूनिवर्सल विंडोज अॅप (UWP) तयार केले आहे. या अॅपच्या विंडोज 11 व्हर्जनमध्ये रिन्यूड एक्रिलिक ग्राफिक इफेक्ट्स देखील बघायला मिळतील. नवीन डेस्कटॉप व्हर्जन खूप वेगवान असेल आणि अॅप स्टार्ट होण्यासाठी फक्त एका सेकंदाचा वेळ लागेल. या नव्या अॅपमध्ये नवीन ड्रॉइंग फंक्शन आहे परंतु स्टीकर्स मात्र दिसत नाहीत. फायनल व्हर्जनमध्ये मोबाईल अॅपमधील सर्व फंक्शन्स असतील अशी अपेक्षा आहे.
नवीन अॅप macOS साठी देखील उपलब्ध होईल, असे याआधी सांगण्यात आले होते. जे मॅक कॅटालिस्टवर आधारित असेल. त्यामुळे फक्त मॅक नव्हे तर आयपॅड युजर्स देखील या अॅपचा वापर करू शकतील. मॅक आणि आयपॅड युजर्सना मात्र काही काळ वाट बघावी लागेल. जोपर्यंत व्हॉट्सअॅप चे macOS व्हर्जन येत नाही तोपर्यंत iPaवर देखील व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही.