नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. व्हॉट्सअॅप देखील नवनवीन फीचर्स आणून युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर करत असतं. मात्र आता व्हॉट्सअप वेब वापरताना देखील चॅटिंगची मजा आणखी वाढणार आहे. लवकरच व्हॉट्सअप युजर्संना वेब व्हर्जनवर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर मिळण्याची शक्यताआहे. एका नव्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप आपल्या वेब व्हर्जनवर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग आणण्यासाठी काम करत आहे.
वेब व्हर्जन 2.2043.7 मध्ये आलेल्या एका नवीन अपडेटनंतर या फीचर पाहण्यात आलं होतं. कंपनी पब्लिक रिलीज आधी याची चाचणी करत आहे. व्हॉट्सअॅप व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल आधीपासूनच अँड्रॉईड व आयओएस अॅपमध्ये उपलब्ध आहे. मात्र आता ही सुविधा डेकस्टॉप व्हर्जनवर देखील मिळू शकते. व्हॉट्सअॅप फीचरला ट्रॅक करणारे ट्विटर अकाउंट WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, लेटेस्ट अपडेट सोबत व्हॉट्सअॅपच्या डेस्कटॉप व्हर्जनवर 2.2043.7 व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी सपोर्ट इंटिग्रेटेड आहे.
पॉप अप विंडोमध्ये video, mute, decline यासारखे ऑप्शन
व्हॉट्सअॅपचं हे फीचर बीटा फेजमध्ये आहे. WABetaInfo ने याबाबत काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वेबचा वापर करत असताना कॉल येतो. एक पॉप विंडो उघडते. या विंडोवर कॉल रिसिव्ह करणे आणि रिजेक्ट करण्याचे ऑप्शन असतील. खाली बाजुला इग्नोर ऑप्शन देखील आहे. तर कॉल करण्यासाठी एक छोट्या पॉप अप विंडोमध्ये video, mute, decline यासारखे ऑप्शन आहेत.
रिपोर्टमध्ये अपडेटसोबत ग्रुप व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलसाठी देखील अपडेट आले आहे. हे फीचर चाचणीसाठी उपलब्ध नाही आणि लवकरच ते वेब व्हर्जनमध्ये अॅड केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. व्हॉट्सअॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार आहेत. लवकरच युजर्सना सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर मिळणार आहे. यामुळे मेसेज एका टाईम लिमिटच्या आतमध्ये ऑटो डिलीट होतील. युजर्संना सेल्फ डिस्ट्रिक्टिंग टेक्स्टसोबत सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फोटो आणि व्हिडीओ सुद्धा शेयर करण्याचा ऑप्शन मिळणार आहे.
काय सांगता? WhatsApp वर पाठलेले फोटो-व्हिडीओ होणार गायब
WABetainfo ने दिलेल्या माहितीनुसार, Expiring Media (एक्सपायरिंग मीडिया) या नावाने फोटो आणि व्हिडीओ स्वतः गायब करणारे फीचर लाँच करण्यात येणार आहे. हे सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर किंवा एक्सपायरिंग मेसेज फीचरचे एक एक्सटेंशन असणार आहे. युजर्संकडे सेल्फ डिस्ट्रिक्टिंग मेसेजच्या रुपाने फोटो, व्हिडीओ किंवा GIF फाइल पाठवण्याचा ऑप्शन असणार आहे. रिसीव्हरने पाहिल्यानंतर ती मीडिया फाईल स्वतः गायब होईल. विशेष म्हणजे डिलीट फॉर इव्हरीवन फीचरप्रमाणे This media is expired लिहिले जाणार नाही. तर हे पूर्ण प्रमाणे गायब होणार आहे.