नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपची जोरदार चर्चा सुरू आहे. व्हॉट्सअॅप ग्रुप आणि प्रोफाईल गुगल सर्चमध्ये दिसत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर पुन्हा एकदा व्हॉट्सअॅपच्या सुरक्षितेतवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हॉट्सअॅप वेबचा वापर हा बऱ्याचदा केला जातो. मात्र आता ते देखील सेफ राहिलेलं नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअॅप वेबचा वापर करणाऱ्या युजर्सचा फोन नंबर गुगल सर्चवर लीक झाल्याचा खळबळजनक प्रकार आता समोर आला आहे. यामुळे व्हॉट्सअॅप युजर्सची चिंता आणखी वाढली आहे.
एका रिपोर्टमध्ये व्हॉट्सअॅप वेब युजर्सचे फोन नंबर गुगल सर्चने इंडेक्स केल्याचं म्हटलं आहे. याच्या माध्यमातून एखादी व्यक्ती गुगलवर योग्य पद्धतीन सर्च करून युजर्सचा मोबाईल नंबर शोधू शकते. इंटरनेट सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया यांनी असा दावा केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याचे काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. यात गुगल सर्चमध्ये व्हॉट्सअॅप वेब वापरणाऱ्या युजर्सचे कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहेत. कॉन्टॅक्ट नंबरसह मेसेजही गुगल सर्चमध्ये उपलब्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राजशेखर राजहरिया यांनी युजर्सचे कॉन्टॅक्ट डिटेल्स व्हॉट्सअॅप वेबद्वारे गुगलवर लीक होत आहेत. ज्यावेळी युजर्स लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर व्हॉट्सऍपचा QR कोडद्वारे वापर करतात, त्यावेळी गुगल याचं इंडेक्सिंग करतो.
Gadgets 360 सोबत चर्चा करताना सायबर सिक्योरिटी रिसर्चर राजसहरिया यांनी याआधीही माहिती दिली होती. युजर्सचा फोन नंबर आणि प्रोफाईल पिक्चर सुद्धा यावेळी गुगल सर्चमध्ये दिसत आहे. म्हणजेच गेल्यावेळेपेक्षा ही स्थिती चिंताजनक आहे. जर कोणाकडे व्हॉट्सअॅप ग्रुपची यूआरएल असेल तर गुगलवर याला सर्च करून जॉइन करू शकतात. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, युजर्स लिंकसोबत ग्रुप जॉईन करू शकतात. तसेच ग्रुप मेंबर्सचा फोन नंबर पाहू शकतात. याशिवाय, ग्रुप मेंबरच्या पोस्ट सुद्धा गुगलवर सर्च करून पाहिल्या जाऊ शकतात. जवळपास 1500 ग्रुप इनव्हाइट लिंक सर्च रिझल्टमध्ये आधीच उपलब्ध आहेत. गुगलकडून इंडेक्स करण्यात आलेल्या काही ग्रुप युजर्संना पॉर्न कॉन्टॅक्टवर रिडायरेक्ट करत आहे. तर काही ग्रुप स्पेसिफिक युजर इंट्रेस्टचे आहेत.
Whatsapp वर Part Time Job च्या नावाने चीनी हॅकर्सचा भारतीय युजर्सना गंडा; "या" आमिषाला नका भुलू
व्हॉट्सअॅपसारखं लोकप्रिय मेसेजिंग अॅप सध्या हॅकर्सच्या निशाण्यावर आलं आहे. चीनी हॅकर्स भारतीय युजर्सना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. पार्ट टाईम नोकऱ्यांचं आमिष दाखवून गंडा घालत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. दिल्लीतल्या थिंक टँक सायबरपीस फाऊंडेशनने याबाबत माहिती दिली आहे. भारतीय य़ुजर्सना व्हॉट्सअॅपवर विविध प्रकारचे मेसेज हे पाठवले जातात. ज्यामध्ये एक लिंक देखील देण्यात आलेली असते. मेसेजमधील लिंक ओपन करताच एका दिवसात 10 ते 30 मिनिटं काम करून 200 ते 3000 रुपये कमवा असा मजकूर दिसतो. तसेच यासारखे पार्ट टाईम कामाशीसंबंधित दिशाभूल मेसेज पाठवले जातात आणि युजर्सना नोकरी आहे असं सांगून जाळ्यात ओढलं जातं आहे. रिपोर्टनुसार, हॅकर्स हे वेगवेगळ्या नंबरवरून लिंक तयार करून पाठवत आहेत. जे ओपन केल्यावर पार्ट टाईम जॉबचं पेज ओपन केलं जातं. तेच पेज विविध भाषांमध्ये तयार करण्यात आलं असून त्याच्या मदतीने युजर्सना गोंधळात टाकलं जातं.