लोकप्रिय WhatsApp मेसेंजर नेहमीच आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन घेऊन येत असतो. परंतु, काही फीचर्स अजूनही व्हाट्सअॅपवर उपलब्ध नाहीत आणि त्यांची मागणी युजर्स वारंवार करत असतात. यातील एक फिचर म्हणजे एकाचवेळी अनेक फोन्समधून अॅपचा वापर करता येणे. परंतु, आता आपल्या युजर्सची गरज ओळखून व्हाट्सअॅपने इशारा केला आहे कि कंपनी लवकरच Multi Device Support घेऊन येईल. त्याचबरोबर Disappearing Mode आणि View Once हे फीचर देखील WhatsApp मध्ये सामील होतील.
व्हाट्सअॅपच्या या नव्या फीचर्सची माहिती WABetaInfo वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. या वेबसाइटने WhatsApp CEO Will Cathcart यांच्यासोबत संवाद साधला होता तेव्हा या आगामी फीचर्सची माहिती समोर आली. कंपनीच्या सीईओनी सांगितले कि, व्हाट्सअॅप Multi Device Support, Disappearing Mode आणि View Once हे फीचर लवकरच रोलआउट केले जातील.
मल्टी डिवाइस सपोर्ट फिचर (Multi-Device Support Feature)
एकच व्हाट्सअॅप नंबर अनेक फोन्समध्ये वापरता यावा अशी अनेकांची मागणी होती. Multi Device Support फीचरच्या माध्यमातून हि मागणी पूर्ण होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार युजर त्यांचे व्हाट्सअॅप अकाउंट को एकाचवेळी 4 फोन्समध्ये वापरू शकतील. यापूर्वी एका स्मार्टफोनमधील व्हाट्सअॅप नंबरने दुसऱ्या फोनमध्ये लॉगिन केल्यावर जुन्या फोनवरील अकॉउंट बंद होत असे. एकापेक्षा जास्त फोन्स वापरणाऱ्या लोकांसाठी हे फिचर वरदान ठरणार आहे.
डिसअपेरिंग मोड फिचर (Disappearing Mode Feature)
Instagram वापरणाऱ्या लोकांना डिसअपेरिंग फीचरची माहिती असेलच. या फीचर अंतगर्त ठरविक वेळेत एखाद्या व्यक्तीला पाठवण्यात आलेले मेसेजेस आपोआप गायब होतात. हे फीचर आता लवकरच व्हाट्सअॅप युजर्सना पण मिळणार आहे.
व्यू वन्स फिचर (View Once Feature)
व्हाट्सअॅप व्यू वन्स फीचर देखील लवकरच रोलआउट होऊ शकते. या फिचरमध्ये पाठवलेला फोटो किंवा व्हिडीओ मेसेज मिळवणारा व्यक्ती फक्त एकदाच बघू शकतो. त्यानंतर तो फोटो किंवा व्हिडीओ पुन्हा बघता येत नाही. या फिचरविषयी अधिक माहिती समोर आली नाही.