अॅपची उपयुक्तता कायम ठेवण्यासाठी WhatsApp वर नवनवीन फिचर सादर होत असतात. याच कारणामुळे या इन्स्टंट मेसेंजरची लोकप्रियता कायम आहे. आता व्हॉट्सअॅप मध्ये ‘Last Seen’ संबंधित अजून एक नवीन सादर केले जाणार आहे. व्हॉट्सअॅपच्या नवनवीन फीचर्सवर बारकाईने नजर ठेऊन असलेल्या WABetaInfo या वेबसाईटने या नव्या फिचरची माहिती दिली आहे. हे फिचर डेव्हलपमेंटमध्ये असून आधी बीटा युजर्स त्यानंतर सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकते.
WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅप वर आता लास्ट सीनच्या सेटिंगमध्ये युजर्सना ‘My contacts except…’ असा एक नवीन ऑप्शन बघायला मिळेल. आता पर्यंत या प्रायव्हसी सेटिंगयामध्ये Everyone, My contacts आणि Nobody हे तीन पर्याय मिळत होते. व्हॉट्सअॅप लास्ट सीन सेटिंगमध्ये ‘My contacts except…’ ऑप्शन मिळाल्यानंतर युजर्स आपले व्हॉट्सअॅप लास्ट सीन कोणाला दाखवायचे आणि कोणाला नाही हे निवडू शकतात. सोप्प्या शब्दात सांगायचे तर तुम्ही व्हॉट्सअॅपवर कधी ऑनलाईन होता हे नको असलेल्या व्यक्तीपासून लपवू शकता, तर अगदी जवळच्या व्यक्तींना दाखवू शकता.
व्हॉट्सअॅपवर येणार मेसेज रिअॅक्शन
WABetaInfo ने अलीकडेच एक स्क्रीनशॉट शेयर केला आहे. यात आगामी मेसेज रिअॅक्शन फीचर म्हणजेच इमोजी रिअॅक्शन फीचरची माहिती मिळाली आहे. मेसेजवरील रिअॅक्शन खाली असलेल्या एका छोट्या रिअॅक्शन्स डायलॉगमध्ये दिसतील. विशेष म्हणजे ग्रुपमध्ये मेसेज पाठवल्यास ग्रुप मधील सर्वांच्या रिअॅक्शन्स इथे दिसतील. हे फिचर इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आधीपासून उपलब्ध आहे. सध्या हे फिचर डेव्हलपमेंटमध्ये असून लवकरच हे सर्वांसाठी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले आहे.