ॲडमिनला व्हॉट्सॲप ग्रुपवर संपूर्ण नियंत्रण देणारे एक फिचर येत असून त्यानुसार ॲडमिन ग्रुपमधील कोणताही मेसेज, फोटो अथवा व्हिडीओ सर्व सदस्यांसाठी डिलिट (डिलिट फॉर एव्हरी वन) करू शकेल. प्रारंभी हे फिचर काही बीटा टेस्टर्ससाठी जारी केले जाणार आहे.
असे तपासा...
तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये हे फिचर काम करतेय की नाही, हे पाहण्यासाठी तुम्ही ॲडमिन असलेल्या ग्रुपमधील कोणताही मेसेज डिलिट करण्याचा प्रयत्न करून पाहा. त्यात ‘डिलिट फॉर एव्हरी वन’ असा पर्याय येत असेल, तर समजून चला की तुम्हाला हे फिचर मिळाले आहे.
फिचरचे नाव काय?
सूत्रांनी सांगितले की, नव्या फिचरचे नाव ‘ॲडमिन डिलिट’ असे असेल. हे फिचर व्हॉट्सॲपच्या अँड्रॉइड २.२२.१७.१२ बिटा व्हर्जनवर जारी केले जाईल. ‘वाबीटा इन्फो पोर्टल’ने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, व्हॉट्सॲप ॲडमिनला डिलिट फॉर एव्हरी वनचा अधिकार देणारे फिचर काही भाग्यशाली बीटा टेस्टर्स वापरकर्त्यांनाच मिळणार आहे. ॲडमिनने मेसेज डिलिट केल्यानंतर सगळ्यांना दिसेल की, मेसेज ॲडमिनने डिलिट केला आहे.
अशी करा प्रक्रिया...
- व्हॉट्सॲपच्या चॅटमध्ये जाऊन डिलिट करू इच्छिता त्या मेसेजवर बोट ठेवा - मेसेजवर थोडा वर बोट दाबून ठेवा म्हणजे मेसेज सिलेक्ट होईल. - जास्त मेसेज डिलिट करायचे असतील तर त्यांच्यावरही बोट ठेवून सिलेक्ट करा. - आता वरील डिलिट म्हणजेच डस्टबिन आयकॉनवर बोट ठेवा. - डिलिट फॉर एव्हरी वन’ पर्याय निवडा. मेसेज डिलिट होईल.
‘कीप मेसेज’वरही सुरू आहे काम
गायब होणारा मेसेज ठराविक अवधीनंतर डिलिट होतो. असे मेसेज महत्त्वपूर्ण वाटल्यास ते जपून ठेवण्यासाठी एक फिचर आणले जाणार आहे. त्यास ‘कीप द डिसअपिअरिंग मेसेज’ असे नाव देण्यात आले आहे.
घोटाळ्यापासून वाचा
व्हॉट्सॲपने २६ जुलैपासून ‘स्कॅम से बचो’ या नावाने एक अभियान सुरू केले आहे. यात ऑनलाइन पेमेंट करताना वापरकर्त्याला एका व्हिडिओद्वारे जागरुक करण्यात येते.