शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
5
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
6
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
7
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
8
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
10
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
11
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
12
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
13
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
14
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
15
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
16
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
17
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
18
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
19
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
20
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली

मोठी बातमी! 1 जानेवारी 2021 पासून 'या' स्मार्टफोन्सवर बंद होईल WhatsApp, पाहा लिस्ट...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 5:21 PM

WhatsApp : 2021च्या सुरूवातीस, म्हणजे 1 जानेवारीपासून काही जुन्या अँड्रॉइड फोन आणि आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप बंद होईल. 

ठळक मुद्देरिपोर्टनुसार, iOS 9 आणि अँड्रॉईड 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टमच्या खालील स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅप सुरु होणार नाही.

नवी दिल्ली : नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपकडून जुन्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी आपला सपोर्ट बंद केला जातो. त्यानंतर पुन्हा नवीन ऑपरेटिंग सिस्टमसाठी व्हॉट्सअ‍ॅपकडून लिस्ट जाहीर केली जाते. 2021च्या सुरूवातीस, म्हणजे 1 जानेवारीपासून काही जुन्या अँड्रॉइड फोन आणि आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप बंद होईल. 

रिपोर्टनुसार, iOS 9 आणि अँड्रॉईड 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टमच्या खालील स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅप सुरु होणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपचे सपोर्ट पेज युजर्सला ऑपरेटिंग सिस्टमचे लेटेस्ट व्हर्जनचा वापर करण्याचा सल्ला देते जेणेकरुन ते सर्व फीचर्स वापरू शकतील. व्हॉट्सअ‍ॅपची सर्व फीचर्स वापरण्यासाठी आयफोन युजर्सला iOS 9 किंवा त्यापेक्षा लेटेस्ट व्हर्जन आणि अँड्रॉइड युजर्ससाठी 4.0.3 किंवा त्यावरील व्हर्जन वापरणे आवश्यक आहे, असे सांगण्यात येते. 

'या' iPhone मॉडेलवर बंद होईल व्हॉट्सअ‍ॅपअ‍ॅपलचे iPhone 4, iPhone 4S, iPhone 5, iPhone 5S, iPhone 6 आणि  iPhone 6S ला ऑपरेटिंग सिस्टम iOS 9 ने अपडेट करावे लागेल. दरम्यान, iPhone 6S, 6 Plus आणि iPhone SE हे पहिले जेनरेशनचे आयफोन आहेत, जे iOS 14 वरून अपडेट केले जाऊ शकतात.

'या' Android फोनवर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाहीजे फोन अँड्रॉइड  4.0.3 वर काम करत नाही, अशा डिव्हाइसवर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. यामध्ये HTC Desire, LG Optimus Black, Motorola Droid Razr, Samsung Galaxy S2 यासारखे मॉडल्स आहेत. दरम्यान, तुमचा फोन कोणत्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालू आहे, हे तुम्हाला माहिती नसल्यास, ते जाणून घेण्याचा मार्ग खूप सोपा आहे. यासाठी, तुम्हाला तुमच्या आयफोन किंवा अँड्रॉइडच्या सेटिंग्जवर जावे लागेल.- जर तुम्ही आयफोन युजर आहात, तर यासाठी तुम्ही आधी Settings मध्ये जा. - त्यानंतर General  वर टॅप करा.- Information वर गेल्यानंतर तुम्हाला आयफोनच्या सॉफ्टवेअरची माहिती मिळेल.

लगेच अपडेट करा फोनअँड्राईड युजर्सला सर्वात आधी Settingsवर जावे लागेल. त्यानंतर  येथे About Phone मध्ये जाऊन युजर फोनच्या ऑपरेटिंग सिस्टमविषयी माहिती मिळू शकेल. ज्यांच्याजवळ फोन अपडेट करण्याचा ऑप्शन आहे, त्यांनी त्वरित नवीन सॉफ्टवेअरसह अपडेट करावे, तर ज्या युजर्संना फोन अपडेट करण्याचा ऑप्शन नाही, त्यांना व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी नवीन फोन खरेदी करावा लागेल.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल