WhatsApp ( Marathi News ) :WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी नव नवीन अपडेट देत असते. सध्या व्हॉट्सअप वर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. कोणतीही चुकीची माहिती पसरवून समाजात तेढ वाढवला जातो. यावर आता मेटा कंपनीने पर्याय आणला असून WhatsApp वर आता एक नवीन फिचर अपडेट होणार आहे. यावर तुम्हाला आलेली माहिती खरी की खोटी हे दिसणार आहे.
AI मुळे नोकऱ्या जाणार नाहीत, मायक्रोसॉफ्टच्या दिग्गज अधिकाऱ्यांनी सांगितले कारण
सध्या जगभरात AI चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट, ओपन एआय सह अन्य कंपन्या यावर काम करत आहेत. काही मिनिटातच तु्म्हाला यावर माहिती मिळणार आहे. पण, याच्या काही नकारात्मक बाजुही आहेत. यामुळे लगेच चुकीची माहिती पसरली जाऊ शकते. WhatsAppव वर अशा अनेक चुकीच्या गोष्टी व्हायरल होत आहेत. त्यामुळे समाजात तेड निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत. आता यावर मेटा कंपनीने खोट्या बातम्या थांबवण्यासाठी Misinformation Combat Alliance (MCA) सोबत भागीदारी केली आहे. यासाठी, ते WhatsApp वर एक माहिती तपासणी हेल्पलाइन सुरू करणार आहे. डीपफेक आणि एआयवरुन तयार केलेली चुकीची माहिती रोखण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकणार आहे.
ही नवीन हेल्पलाइन पुढील महिन्यात सुरू केली जाईल. याचे लाँचिंग मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. यामुळे एआय जनरेटेड मीडियामधून चुकीची माहिती रोखण्यात मदत होईल. यामुळे अनेक लोकांची बदणामी होण्यापासून वाचू शकते. अनेक वेळा सायबर गुन्हेगार काही सेलिब्रिटींचे फोटो वापरतात आणि त्यांचे बनावट व्हिडीओ बनवतात.
माहिती खरी की खोटी अशी तपासा
तुम्हाला WhatsApp वर जर चुकीची माहिती आली असेल तर तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर दिला जाईल या नंबरवर संदेश पाठवायचा आहे. यानंतर काही वेळातच ती सिस्टीम आपले काम करेल आणि ती माहिती खरी आहे की खोटी हे तपासेल आणि त्याची माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवेल.
WhatsApp ला अनेक भाषांचा सपोर्ट मिळणार
व्हॉट्सअप वर अनेक भाषांसाठी सपोर्ट उपलब्ध असेल. व्हॉट्सॲप चॅटबॉट अनेक भाषांसाठी सपोर्टसह येईल. इंग्रजीशिवाय इतर तीन प्रादेशिक भाषांचाही सपोर्ट असेल. यावर तुम्ही एआय डीपफेकची तक्रार करू शकाल.