नवी दिल्ली : सोशल मीडियामधील व्हॉट्सअॅप हे बहुपयोगी माध्यम बनले आहे. अगदी छोट्या मोठ्या माहितीपासून ते कागदपत्रे, छायाचित्रे, व्हिडिओ पाठवण्यासाठी मोबाइलमधील व्हॉट्सअॅपचा सर्रास वापर केला जाते. मात्र, आता व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीने पाठविले मेसेज त्याने लिहिलेला आहे की फॉरवर्ड केलेला आहे, याची शहानिशा होणार आहे. या नवीन फीचरचा उपयोग ग्रृप चॅटिंग आणि एक-एकेकांशी चॅट करण्यास मदत होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेक खोट्या बातम्या पसरत असल्याने याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, व्हॉट्सअॅप या नव्या फिचरमधून अफवा पसरवणाऱ्यांनाही आळा बसणार असल्याचे समजते. दरम्यान, व्हॉट्सअॅपने फेक न्यूजसंदर्भात भारतीय युजर्ससाठी एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकाद्वारे 10 प्रमुख मुद्द्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन भारतीय व्हॉट्सअॅप युजर्संना करण्यात आले आहे. फेक न्यूज आणि अफवांपासून बचाव करण्यासाठी व्हॉट्सअॅपने अभ्यासाअंती हे निवेदन दिले.
व्हॉट्सअॅपने सूचवलेले मुद्दे1- फॉरवर्ड केलेला मेसेजपासून सावधान राहा. 2- केवळ अशाच माहितीवर प्रश्न विचारा, जो तुम्हाल सतावत आहे. 3- ज्या माहितीवर विश्वास ठेवणे अवघड वाटते, त्याबाबत खात्री करुन घ्या. 4- जे मेसेज दैनंदिन मेसेजेसपेक्षा काहीतरी विचित्र वाटतात, त्यापासून सावधान. 5- व्हॉट्सअॅपवर आलेल्या छायाचित्रांना काळजीपूर्वक पाहा. 6- मेसेजमध्ये आलेल्या लिंकवर क्ली करुन त्याची खात्री करा. .7- इतर माहिती स्त्रोतांचा वापर करा. 8- विचार करुनच माहिती पुढे फॉरवर्ड करा. 9- सातत्याने चुकीची माहिती किंवा अफवा एखाद्या नंबरवरुन येत असल्यास तो नंबर ब्लॉक करा. 10- खोट्या बातम्या नेहमीच पसरल्या जातात, याबाबत सतर्क राहा.