गेल्या काही वर्षात भारतात अनेक कंपन्यांनी आपले स्मार्ट टीव्ही सादर करण्यास सुरवात केली आहे. यात पारंपरिक टीव्ही ब्रँड तर आहेतच, परंतु स्मार्टफोन आणि इतर गॅजेट्स बनवणाऱ्या कंपन्या देखील स्मार्ट टीव्ही सेगमेंटमध्ये उतरून आपली इकोसिस्टम मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अश्यावेळी जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्हाला छोटया टीव्हीवर समाधान मानावे लागेल. जर तुम्हाला कमी किंमतीत मोठा स्मार्ट टीव्ही विकत घ्यायचा असेल तर तुम्ही सेकंड हॅन्ड स्मार्ट टीव्हीचा विचार करू शकता.
अनेक असे प्लॅटफॉर्म्स आणि वेबसाईट आहेत जिथून तुम्ही कमी किंमतीत फक्त स्मार्ट टीव्ही नव्हे तर इतर प्रोडक्ट देखील खरेदी करू शकता. काही प्लॅटफॉर्म्स सेकंड हॅन्ड प्रोडक्टवर देखील वॉरंटी देतात. ही वॉरंटी तीन ते सहा महिन्यांपर्यंत मर्यदित असू शकते. पुढे आम्ही अशाच काही प्लॅटफॉर्म्सची माहिती दिली आहे जिथे तुमची सेकंड हॅन्ड स्मार्ट टीव्ही विकत घेऊ शकता.
OLX
सेकंड हॅन्ड वस्तू विकण्यासाठी आणि खरेदीसाठी OLX प्रसिद्ध आहे. ओएलएक्सवर जुने टीव्ही विकत घेता येतील. इथे वस्तूंचे मालक आपल्या वस्तू लिस्ट करतात त्यामुळे कदाचित इतर प्लॅटफॉर्मच्या तुलनेत तुम्हाला चांगला भाव मिळू शकतो. परंतु इथून घेतलेल्या वस्तूंवर कोणतीही वॉरंटी नसते आणि खरेदी करताना वस्तू तपासून घ्याव्या लागतात.
Amazon Refurbished Store
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वरून फक्त नवीन स्मार्ट टीव्ही विक्रीसाठी येत नाहीत, तर इथे जुन्या (Refurbished) टीव्ही देखील उपलब्ध होतात. इथे जुने टीव्ही कमी किंमतीत आणि त्यातील काही टीव्ही सहा महिन्यांच्या वॉरंटीसह उपलब्ध होतात. जर तुम्ही बजेटमध्ये चांगला टीव्ही किंवा स्मार्टटीव्ही विकत घेण्याचा विचार करत असाल तर अॅमेझॉन के रिफरबिश्ड स्टोरवरील पर्याय बघू शकता. Flipkart 2Gud अॅमेझॉन प्रमाणेच फ्लिपकार्टच्या सेकंड हॅन्ड स्टोरचे नाव 2Gud असे आहे. इथे तुम्ही सेकंड हॅन्ड वस्तू विकत घेऊ शकता. या प्लॅटफॉर्मवर अनेक टीव्ही उपलब्ध आहेत. यातील काही प्रोडक्ट वॉरंटीसह विकत घेता येतील.
Quikr
OLX आणि Quikr मध्ये जास्त फरक नाही. इथे देखील तुम्ही तुमच्या बजेट मध्ये स्मार्ट टीव्ही आणि इतर प्रोडक्ट शोधू शकता. तसेच इथे तुम्ही किंमत कमी करण्यासाठी मालकाशी संपर्क साधू शकता. क्विकर प्लॅटफॉर्मवरून टीव्ही विकत घेण्याआधी डिवाइस नीट तपासून घ्या.
Facebook Marketplace
फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवर सेकंड हॅन्ड वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी एक सेक्शन जोडले आहे. इथे युजर्स आपल्या जुन्या-नवीन वस्तू विकू शकतात. तसेच इतर युजर आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या फेसबुक युजरकडून त्या वस्तू विकत घेऊ शकतात. हे प्लॅटफॉर्म OLX आणि Quikr सारखे आहे.